शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे ‘भारतरत्न’चा सन्मान होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:58 IST

भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले

ठळक मुद्दे ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर नव्या पिढीला समजण्याची नितांत गरज भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व, राष्ट्रभक्ती वादातीत

पुणे : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा संकल्प अभिनंदनास्पद आहे. सावरकरांना भारतरत्न जाहीर झाल्यास तो ‘भारतरत्न’ या सन्मानाचा गौरव असेल, असे मत सावरकरप्रेमींकडून व्यक्त होत आहे. तर, संकल्पपत्रात या  पुरस्काराबद्दलचा मुद्दा समाविष्ट करून भाजप मतांचे राजकारण करीत आहे, असाही मतप्रवाह व्यक्त होत आहे.ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर नव्या पिढीला समजण्याची नितांत गरज आहे. सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारक, महापुरुषाला आजवर काँग्रेस सरकारने बदनाम, कलंकित केले. सावरकर हे बुद्धिवादाचे प्रमाण आहे. त्यांचे राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा वादातीत आहे. आजवर सावरकरांवर अन्यायच झाला आहे.’’

अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व, राष्ट्रभक्ती वादातीत आहे. त्यांचा सन्मान झाल्यास तो ‘भारतरत्न’ या किताबाचाच सन्मान होईल. त्यामुळे संकल्पपत्रातून आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मात्र, २०१४पासून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. या कालावधीत अनेकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. एवढ्या वर्षांत सावरकरांच्या नावाचा विसर पडला का? आम्हाला निवडून दिले तर भारतरत्न देऊ, असे का म्हणायचे? भाजपा आश्वासनातून मतपेट्यांचे राजकारण करू पाहत आहे.’’अभिनेते योगेश सोमण म्हणाले, ‘‘संकल्पपत्रात या विषयाचा अंतर्भाव अभिनंदनीय आहे. भाजपा जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलते. त्यामुळे राज्य सरकारकडून सावरकरांच्या नावाची भारतरत्नसाठी नक्कीच शिफारस केली जाईल.’’.........स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार स्वीकारले असते, तर भारताने आज किती तरी पटींनी अधिक प्रगती केली असती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष झाले आणि आजही होत आहे. आपण त्यांना एका विशिष्ट चौैकटीत बंदिस्त केले व ते आजवर उपेक्षितच राहिले. कोणताही सन्मान मिळावा म्हणून सावरकरांनी कधीच विचार केला नाही. भारतरत्न देऊन आपण किमान ही उपेक्षा कमी करू शकू. भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले, ही सकारात्मक बाब आहे.  - मिलिंद रथकंठीवार , नियोजित अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय सावरकर साहित्य संमेलन

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपाGovernmentसरकारElectionनिवडणूक