शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 15:20 IST

क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले

पुणे: भारत माता की जय... छत्रपती शिवाजी महाराज की जय... भारतीय स्वातंत्र्यसेनानींचा विजय असो... जय श्रीराम अशा घोषणा देत शहराच्या मध्यभागात भारतीय क्रांतिकारक व महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले. यात्रेत सहभागी प्रभु श्रीराम मूर्ती रथाने सर्वांचे लक्ष वेधले.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, सहसंयोजक अश्विन देवळणकर, कुणाल टिळक यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठया संख्येने पारंपरिक वेशात या शोभायात्रेत सहभाग घेतला. श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ व इतर मंडळे, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, वेत्रचर्म पथक, वेदपाठ शाळा पुणे यांसह श्री गणेश नाथ महाराज संस्थान आषाढी दिंडी क्रमांक १८३ चे वारकरी देखील यात्रेत सहभागी झाले होते. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन उत्साहाने सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून निघालेल्या शोभायात्रेचा समारोप तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे झाला. यावेळी येथे ग्रामगुढी देखील उभारण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेgudhi padwaगुढीपाडवाIndiaभारतLokmanya Tilakलोकमान्य टिळकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज