शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

भंडारा दुर्घटनेतील दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 13:27 IST

भंडारा येथील घटना दु:खद आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये नवबालक आहे त्या सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देटीकात्मक आरोपांचेही पाहू

पुणे: भंडारा दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल. विरोधकांकडून आरोप होत आहेत, त्यातले तथ्य तपासून पाहू. पण या दुर्घटनेतील दोषींना कडक शासन करणार असून  कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, भंडारा येथील घटना दु:खद आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये नवबालक आहे त्या सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करणार. सतत ऑन ड्यूटी कोणीतरी हवे. धक्कादायक आहे. वेदना होत आहेत. आईवडिलांना दु;ख सावरता यावे म्हणून प्रार्थना करतो. दोषींना कडक शासन करू मुलाहिजा ठेवणार नाही. जास्तीची माहिती घेत आहे.राजेश टोपेंना तिथे जायला सांगितले आहे.

भाजपाच्या कार्यकाळात हॉस्पिटलचे काम झाले अशी टीका होत आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, कोणाच्या कार्यकाळात काम झाले वगैरे गोष्टी गोण आहेत आत्ता. शनिवारी पहाटे २ ला ही दुर्घटना घडली आहे. त्याची चौकशी करतो आहोत. काही आरोप केले जात आहेत, त्याचीही चौकशी करणार आहोत.

कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आणि सर्व एन आय सी यु युनिट चे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर यामध्ये नक्की काय घडलं हे समजू शकेल. परंतु त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यावरती नक्कीच विचार केला जाईल. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पवार म्हणाले... पुढे पवार म्हणाले, महेश कोठे हे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत. महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारfireआगhospitalहॉस्पिटल