कोरोनानंतरच्या फंगल इन्फेक्शनपासून सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST2021-05-10T04:10:31+5:302021-05-10T04:10:31+5:30
कोविड झाल्यानंतरची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? कोरोना होऊन बरे झाल्यानंतर ४-५ आठवड्यांनी पचनविषयक समस्या, खोकला, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, नैराश्य, ...

कोरोनानंतरच्या फंगल इन्फेक्शनपासून सावधान!
कोविड झाल्यानंतरची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय?
कोरोना होऊन बरे झाल्यानंतर ४-५ आठवड्यांनी पचनविषयक समस्या, खोकला, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, नैराश्य, सांधेदुखी, श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांचे आणि न्यूरोलॉजिकल विकार अशा अनेक पोस्ट-कोविड लक्षणे होतात. एवढेच नव्हे तर दात, जबडे आणि हाडांच्या विकारांचादेखील यात समावेश आहे. आता कोविड संसर्गाच्या परिणामांबद्दल नवीन अहवाल आणि डेटा प्रकाशात येत आहे. सध्या हा रोग म्यूकोर्मिकोसिसशी जोडला गेला आहे.
म्यूकोर्मिकोसिसशी म्हणजे काय?
म्यूकोर्मिकोसिसशी हे एक गंभीर बुरशीजन्य इन्फेक्शन आहे. अनेक कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्यूकोर्मिकोसिस आढळत आहे. हा रोग इम्यूनोकॉम्प्रेशन, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन यासारख्या विविध कारणांमुळे उद्भवते. हे इन्फेक्शन तोंड, नाक आणि घशात उद्भवते आणि नंतर ते डोळे, मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरते. त्याव्यतिरिक्त फुफ्फुस, पोट, किडनीसारख्या इतर अवयवांवर देखील होतो.
म्यूकोर्मिकोसिसची लक्षणे?
या आजारामुळे श्वास घ्यायला अडथळा, दात हलणे, जबडा दुखणे, तोंडाची दुर्गंधी, एका बाजूचे नाक गच्च होणे, डोळे सुजणे, डोळ्यांची मर्यादित हालचाल, घसा खवखवणे, घसा दुखणे आणि सूजलेल्या भागावर काळे डाग पडणे, अशी लक्षणे दिसतात. कधी कधी ताप, पोटामध्ये दुखणे, रक्तासह किंवा काळसर उलटी होणे, पोट फुगणे असे देखील लक्षणे दिसतात.
म्यूकोर्मिकोसिसचा उपचार कसा केला जातो?
या रोगाचे निदान सीटी किंवा सीबीसीटी स्कॅन आणि एंडोस्कोपीच्या साहाय्याने केले जाऊ शकते. एकदा, संसर्ग आढळल्यास रुग्णाला अँटीफंगल थेरपी दिली जाते. जर संसगार्मुळे आपल्या अवयवांवर त्रास होत असेल तर रुग्णाला सर्जरी करावी लागते. रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि उपचारांना उशीर करू नये.
म्यूकोर्मिकोसिस कसे टाळावे?
नियमित मास्क घालणे, नियमितपणे हात धुणे, नाक स्वच्छ ठेवणे, डोळ्यांची चाचणी करणे. कुठल्याही दमट, अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, आपला परिसर, घर, किचन व फ्रिज स्वच्छ ठेवावे. कुठेही बुरशी येणार नाही याची काळजी घ्या. बुरशीचे बीजकण धूळ-मातीमध्ये असू शकतात त्यामुळे धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा.
पोस्ट कोविड काळजी
कोविडनंतरच्या आरोग्याकडे रुग्णांनी दुर्लक्ष करू नये. श्वासाचे व्यायाम-कोविड इन्फेक्शननंतरही दीर्घ श्वासोच्छवास सुरू ठेवावे. यामुळे ऑक्सिजन संपृक्तता वाढते रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते आणि सायनस निरोगी ठेवण्यास मदत होते.
योग्य औषधे- त्याचप्रमाणे, वय आणि इतर गोष्टी जसे की आजारांचे विचारात घेतली पाहिजे आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली योग्य औषधे नियमित घ्यावीत.
आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेला आहार घेणे आवश्यक आहे. ताजी फळे, भाज्या, मसूर, बियाणे आणि डाळींचा आहारात समावेश करावा. प्रथिनेयुक्त आहार फुफ्फुसांच्या खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीस मदत करू शकतो.
भरपूर प्रमाणात द्रव घ्या आणि भरपूर पाणी प्यावे. पुरेसे विश्रांती, नियमित योग किंवा ध्यान आवश्यक आहे. दात दुखणे, डोके दुखणे, वारंवार सर्दी होणे इत्यादी यांना दुर्लक्षित करू नये. या लक्षणांबद्दल त्वरित डॉक्टरांना सांगा.
- डॉ. पूजा मुळे-इटके, ओरल फिजिशियन