शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दररोज भांडण्यापेक्षा 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:44 IST

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देपरस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक

युगंधर ताजणे- 

पिंपरी : दिवस रात्र त्यांच्यात चाललेली भांडणे घरातल्या सगळ्यांना नकोशी झालेली, उच्चशिक्षित असून, दोघांना भरभक्कम पगार असताना छोट्यामोठ्या कारणाने वादाला सुरुवात व्हायची, यातून एकमेकांना मानसिक त्रास व्हायचा. कितीही प्रयत्न केला तरीही नाते पून्हा रुळावर येणार नाही असे कळल्यानंतर मात्र 'मनातलं बोलून' वेगळं झालेलं बरं असा विचार करून वेगळं होण्याचा निर्णय अनेक जोडप्यांनी घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन नवीन वाट निवडणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2020 पर्यत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. तर या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार 912 दावे निकाली निघाले आहेत. एकतर्फी घटस्फोट, नांदवयास येण्यासाठी आणि विवाह रद्द बातल करण्यासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्टअखेरीस चार हजार 273 अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे 3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्याची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. यामागील कारण सांगायचे झाल्यास यापूर्वी मेडीएशनचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यातून तडजोडीचे महत्व जोडप्यांना समजावून सांगण्यात आले. पैसा, वेळ याची यातून बचत होणार असल्याचे त्यांना पटवून देण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार जुळून आले तर काहींनी संमतीने विभक्त होण्यास पसंती दिली. कोरोनाच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा फटका अनेक जोडप्यांना बसला आहे. यात प्रामुख्याने आर्थिक अडचण, पगार - नोकरी कपात ही कारणे घटस्फोट घेण्यामागे असल्याचे कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या वकिल व समुपदेशक यांनी सांगितले. 

* आयटीयन्सची संख्या सर्वाधिक, वयोगट 30 च्या पुढे एकमेकांच्या संमतीने काडीमोड घेण्याचे दावे दाखल करण्यात सर्वाधिक संख्या आयटीयन्सची आहे. उच्चशिक्षित कुटुंबे, भरपूर पगार, आणि यामुळे वाढत चाललेली अहंपणाची भावना याचा परिणाम नात्यावर झालेला दिसून येत आहे. एकमेकांना जास्त समजून घेण्यापेक्षा झटपट नाते तोडून पुन्हा दुसरे नाते जोडण्यावर त्यांचा अधिक भर असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय घरच्या व्यक्तींचा नको तितका हस्तक्षेप नवरा बायकोच्या संसारात असल्याने त्याचा परिणाम नात्यावर होतो. मात्र वाद किंवा भांडणात या गोष्टी लक्षात येत नसल्याचे द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी सांगितले. 

* 'म्युच्युअली घटस्फोट घेण्याचे कारण काय ? - एकमेकांची बदनामी होत नाही, संमतीने पुन्हा नवीन मार्ग निवडता येतो. -आपल्या भांडणाचा परिणाम मुलांवर होऊ द्यायचा नाही. असा विचार करून घटस्फोटाचा निर्णय घेणे- शारीरिक व मानसिक त्रास कमी होण्यासाठी- मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना निर्माण होत नाही- वेळ व पैसा वाचतो व कमी वेळा न्यायाला जावे लागते- घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDivorceघटस्फोटCourtन्यायालयFamilyपरिवार