शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा अन् उद्धव यांना भेटण्याची भाषा..! मंत्री शिरसाठ नेमकं काय म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:22 IST

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले,आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी.

पुणे - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याच्या चर्चांवर आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंब एकत्र यावं, यावर आमच्या शुभेच्छा आहेत. भेट झाली, यात काही राजकीय चर्चा झाल्या असतील. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांना भेटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला बोलावलं तर मी नक्कीच भेटायला जाईन. पण त्यानंतर पुन्हा राजकीय चर्चा करू नका,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.आज पुण्यातील बालगंधर्व येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले,आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी. भविष्यात ते चांगले, मोठे नेते व्हावेत, ही मनापासून शुभेच्छा.”दरम्यान, गुजरातहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान काल अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं. ही विमान दुर्घटना संपूर्ण देशाला जागं करणारी होती. मन हेलावणारी घटना आहे. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले. चूक कशी झाली, कोणामुळे झाली, याची चौकशी होईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले, एअर इंडियाचा अपघात झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. त्या परिसराचा पुनर्विकास व्हायचा होता, पण तो अद्याप झाला नाही. भविष्यात अशाच घटना पुणे आणि मुंबईतही घडू शकतात. त्यामुळे येत्या काळात योग्य उपाययोजना करायला हव्यात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Shirsatसंजय शिरसाट