शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात प्रेमसंबंधातून झालेल्या 'त्या' खून प्रकरणी प्रेयसीलाही अटक; मुलीनेच कट रचल्याचे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:42 IST

आई, वडील, भाऊ व त्याचा मित्र अश्या चौघांनी मिळून मुलाला धारदार शस्त्र, सिमेंटचे गट्टू, व लोखंडी रॉड ने मारहाण केली होती

वारजे : शिवणेत झालेल्या प्रद्युम्न कांबळे खून प्रकरणी त्याच्या प्रेयसी असलेल्या प्राजक्ता पायगुडे हिला देखील कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या आता आता पाच झाली आहे.

सोळा मार्चला दांगट पाटील नगर मध्ये प्राजक्ता हीच्या आई, वडील, भाऊ व त्याचा मित्र अश्या चौघांनी मिळून धारदार शस्त्र, सिमेंटचे गट्टू, व लोखंडी रॉड ने केलेल्या मारहाणीत कांबळे याचा मृत्यू झाला होता. तपास दरम्यान या कारस्थानात प्राजक्ता हिचा देखील समावेश असल्याचा खुलासा झाल्याने तिला ही आरोपी करत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अँट्रॉसिटी कलम देखील लावण्यात आले असून अधिक तपास पोलीस सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे करीत आहेत.

आरोपी प्राजक्ता व मयत प्रद्युम्न यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यास तिच्या घरच्यांचा विरोध होता.  तो त्यादिवशी प्राजक्ताला भेटायला तिच्या घरी आला होता. संध्याकाळी तिचे पालक व भाऊ आल्यावर त्यांनी प्रद्युम्न घरी आल्याचा राग आला म्हणून रागाच्या भरात आधी घरात व नंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केल्यावर इमारतीच्या बाहेर रस्त्यावर त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्यास जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान मृत्यू पूर्वी मयत प्रद्युम्नचे डोळे काढून व त्याच्या गुप्तांगाला इजा करून अनन्वित छळ करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. व या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या पोस्टमार्टेम मध्ये काहीच आढळून आले नसल्याचे सांगितले.

प्राजक्ताचा आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणी धक्का बसल्याने प्राजक्ता हिने देखील लगेच स्वतःला घरात कोंडून घेत ओढणी ने गळफास घेण्याचा व नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती लोकांनी दिली. पोलिसांनी लगेच दार तोडून घरात प्रवेश करून तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसWomenमहिलाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी