शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; उद्यापासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:46 IST

आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देव्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत

पुणे : पुण्यात व्यापारी महासंघाने जागोजागी आज घंटानाद आंदोलनाला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून शहरातील दुकानांची वेळ वाढून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी यातून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. शहरातील कोरोना परिस्थिती गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात येत आहे. रूग्णसंख्या सातत्याने कमी झालेली असतानाही सरकारने व्यवसायांच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला नाही़. त्यामुळे झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी आज दुपारी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 

उद्यापासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

रविवारी व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर सरकारला निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. नाहीतर बुधवारपासून दुकाने ७ पर्यंत उघडी ठेवणार असा इशाराही देण्यात आला होता. अजूनही सरकारने व्यापाऱ्यांच्या मागणीची दाखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.  

दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील इतर सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही़. एकीकडे बाजारपेठा सोडून सर्व गोष्टी चालू आहेत, राजकीय सभा समारंभ, आमदारांच्या मुलांचे शाही विवाह होतात. परंतु, दुसरीकडे व्यापारी वर्गालाच लॉकडाऊनचे नियम लादले जात आहेत. यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी, वेळेत वाढ करण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली होती. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGovernmentसरकारMLAआमदारMayorमहापौर