तब्बल तीन महिन्यांनी बेल्हा बैलबाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:21+5:302021-06-09T04:13:21+5:30
येथील आठवडे बाजार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गेली तीन महिने बंद करण्यात आला होता. आजचा बैलबाजार सकाळी सुरू ...

तब्बल तीन महिन्यांनी बेल्हा बैलबाजार सुरू
येथील आठवडे बाजार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गेली तीन महिने बंद करण्यात आला होता. आजचा बैलबाजार सकाळी सुरू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली गेली. आठवडे बाजारातील लोकांनी तोंडाला मास्क लावले होते. बाजारातील सर्व दुकाने व ग्राहक यांमध्ये सुरक्षित अंतर राखले होते. आठवडे बैलबाजारात सॅनिटायझरचा वापर प्रत्येक शेतकरी व व्यापारी आपापल्या पद्धतीने करीत होते. प्रसिद्ध असलेल्या आठवडे बैलबाजारात बैलांची आवक अगदी थोडीच झाली होती. तसेच बैलांचे भावही चांगले होते. हा बैलबाजार दि.२९\०३|२०२१ रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे बंद करण्यात आला होता. आज तब्बल तीन महिन्यांनंतर हा बाजार सुरू करण्यात आला. या ठिकाणी लांबून शेतकरी व व्यापारी आले नव्हते. परिसरातील शेतकरी व व्यापारी अगदी कमी प्रमाणावर आले होते. पाऊस पडत असल्यामुळे व खरीप हंगाम चालू झाला आहे. तसेच शेतीच्या कामासाठी बैलांची अत्यंत गरज लागते. अनेक ठिकाणी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. बैलबाजार चालू झाल्यामुळे शेतकरीवर्गांनी आनंद व्यक्त केला. शेळ्यांचीही आवक झाली. आजच्या बैलबाजारात ७० ते ७५ बैल विक्रीसाठी आले होते. बैलजोडीचा भाव ३५ ते ३० हजार होता. बाजारात बैलांची विक्रीही बऱ्यापैकी झाली असल्याची माहिती कार्यालयीन प्रमुख प्रमोद खिल्लारी यांनी दिली.
काशिनाथ नवले (नळावणे)
-पाऊस अनेक ठिकाणी चांगला पडत असून शेतीच्या कामासाठी बैलांची गरज आहे. तसेच खरीप हंगामही चालू झाला आहे.