बारामती व्यापारी महासंघातर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST2021-04-22T04:09:26+5:302021-04-22T04:09:26+5:30

बारामती : वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने बारामतीतील अंत्यविधीचे काम करणाऱ्या ...

On behalf of Baramati Traders Federation | बारामती व्यापारी महासंघातर्फे

बारामती व्यापारी महासंघातर्फे

बारामती : वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने बारामतीतील अंत्यविधीचे काम करणाऱ्या कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १०० पीपीई किटची मदत दिली. हे किट मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

बारामतीतील सध्याच्या कोरोना परिस्थितीत शासन, प्रशासन यांच्याबरोबर सामाजिक संस्थेनेसुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने पीपीई किटचे वाटप केले.

या वेळी बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उपाध्यक्ष सुरेंद्र मुथा, सचिव जगदीश पंजाबी, फक्रुशेठ भोरी, स्वप्निल मुथा, आदेश वडुजकर, शाम तिवाटने, मनोज मुथा, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, संजय सोमाणी, नरेंद्र मोता, रमेश पंजाबी आदी उपस्थित होते.

२१०४२०२१बारामती—१२

Web Title: On behalf of Baramati Traders Federation