नीरा-भीमातून ऑईल कंपन्यांकडे इथेनॉल पाठविण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:11+5:302020-12-04T04:30:11+5:30
कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून आज अखेर इथेनॉलचे ८ लाख ४२ हजार ९२३ लि. व अल्कोहोलचे १७ लाख १९ हजार ९६१ ...

नीरा-भीमातून ऑईल कंपन्यांकडे इथेनॉल पाठविण्यास सुरूवात
कारखान्याच्या आसवणी प्रकल्पातून आज अखेर इथेनॉलचे ८ लाख ४२ हजार ९२३ लि. व अल्कोहोलचे १७ लाख १९ हजार ९६१ लि.चे उत्पादन घेतलेले आहे. कारखान्याने आजपर्यंत उसाचे १ लाख ९१ हजार ८४० मेट्रिक टन एवढे चांगले गाळप पूर्ण केले आहे. तसेच सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून ८२ लाख २७ हजार ६२१ युनिट वीजेची विक्री करण्यात आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————
फोटो ओळी : शहाजीनगर येथील नीरा भीमा कारखान्याचे इथेनॉलचे टँकर आॅइल कंपन्यांकडे रवाना करण्याचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
०३१२२०२०-बारामती-०४
——————————————
===Photopath===
031220\03pun_1_03122020_6.jpg
===Caption===
शहाजीनगर येथील नीरा भीमा कारखान्याचे इथेनॉलचे टँकर आॅइल कंपन्यांकडे रवाना करण्याचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.