एकवीरादेवी दर्शनाने नववर्षाची सुरूवात

By Admin | Updated: January 2, 2015 01:08 IST2015-01-02T01:08:59+5:302015-01-02T01:08:59+5:30

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी गुरुवारी पहाटेपासून कार्ले गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़

The beginning of the new year in Ekviradevi Darshan | एकवीरादेवी दर्शनाने नववर्षाची सुरूवात

एकवीरादेवी दर्शनाने नववर्षाची सुरूवात

लोणावळा : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी गुरुवारी पहाटेपासून कार्ले गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़
पहाटेचा अभिषेक व आरतीसाठी हजारांहून अधिक भाविक मंदिर परिसरात दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते़ दिवसभर भाविकांचा हा ओघ कायम होता़
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक कुलस्वामींनीचे दर्शन घेतले़ यासह शाळांच्या सहलींनी मंदिराचा परिसर गजबजला होता़
अंबरवाडी येथिल स्वयंभू श्री सिध्दीविनायक मंदिर, रायवुड येथील स्वयंभू सिध्देश्वर मंदिर व लोणावळ्याचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात भाविकांनी सकाळ पासून गर्दी करत नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली़
मागील काही दिवसांपासून नागरिकांचा तिर्थक्षेत्रांकडे ओढा वाढू लागल्याने देवीच्या दर्शनाकरिता कोकण तसेच पिंपरी चिंचवड, वाल्हेकरवाडी भागातूनही पायी पालख्या गडावर दाखल झाल्या आहेत़
(वार्ताहर)

Web Title: The beginning of the new year in Ekviradevi Darshan