शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:12 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देअधिसभा सभागृहाच्या बाहेर मतदानाची व्यवस्था केल्याने उच शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी यावर तीव्र आक्षेप मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अधिसभा सभागृहाच्या बाहेर मतदानाची व्यवस्था केल्याने उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. नियमानुसार तातडीने सभागृहातच मतदानाची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला. दुपारी साडे बाराची मतदानाची वेळ आहे. मात्र या गोंधळात वेळ उलटून गेला तरी मतदान सुरु झालेले नाही.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यवस्थापन प्रतिनिधीतून डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे सोमनाथ पाटील आणि प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रा. शामकांत देशमुख हे एकाच पॅनेलमधून अधिसभेवर निवडून आलेले आहेत. मात्र, या दोघांमध्ये आता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. या दोघांमध्ये निवडणूक चुरस होणार असल्याचे चित्र आहे. प्राचार्य गटातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर चासकर आणि नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्यात निवडणूक होत आहे. गायकवाड हे विद्यापीठाचे "बीसीयुडी'चे संचालक म्हणून काम पाहिले आहेत. त्यामुळे यात कोण विजयी होणार, त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच शिक्षक गटातून महेश आबाळे आणि कन्हू गिरमकर यांच्यात लढत होणार आहे. हे सर्व निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी