करडेला ओढा खोलीकरणास सुरुवात
By Admin | Updated: June 13, 2015 22:29 IST2015-06-13T22:29:35+5:302015-06-13T22:29:35+5:30
करडे (ता. शिरूर) येथे लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या अंतर्गत ओढा खोलीकरणाच्या कामास नुकताच शुभारंभ झाला.

करडेला ओढा खोलीकरणास सुरुवात
निमोणे : करडे (ता. शिरूर) येथे लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या अंतर्गत ओढा खोलीकरणाच्या कामास नुकताच शुभारंभ झाला.
या वेळी गावालगत असणाऱ्या सार्वजनिक बारवेलगतच्या ओढ्याचे खोलीकरण सुरू झाले. या खोलीकरणामुळे लगत असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. या कामासाठी संबंधीत खात्याने मोफत मशिन आणि इंधनखर्च दिला आहे. सार्वजनिक कामाशिवाय शेतकऱ्यांनी अशा कामासाठी मागणी केल्यास मशिन त्यांना मोफत मिळू शकते.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी या भागात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी तत्कालीन सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील यांच्या पुढाकाराने मोठी जलसंधारणाची कामे झाली होती. यामध्ये पाझर तलावातील गाळ काढणे, ओढ्यांचे खोलीकरण, पाझर तलाव उभारणी, बांधबंदिस्ती, समतल चर निर्मिती अशी अनेक कामे झाली, त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली आहे.
या ओढाखोलीकरणाच्या प्रारंभी माजी सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, उपसरपंच गणेश रोडे, लंघेवाडीचे माजी सरपंच संतोष लंघे, भास्कर वाळके, अरुण जगदाळे, अल्ताफ शेख, शेख लाल तांबोळी,
सुनील बांदल, भास्कर जगदाळे, बाळासाहेब वाळके, युवराज निंबाळकर, कृषी सहायक के. एन. सात्रस इ. मान्यवर व ग्रामस्थ
उपस्थित होते.