शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलनंतर दूध बघणार परीक्षा, सरकारने अनुदान न दिल्याने भाव भडकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 20:41 IST

गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्दे५० दिवसांपासून लिटरमागे ५ रुपयांचे अनुदान थकीत

पुणे : दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यानी केलेल्या आंदोलनानंतर दूध उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.                दूध अनुदान थकल्याच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक गुरुवारी रात्री पुण्यात आली. त्यात ५८ सहकारी आणि खासगी डेअरीचे ७६ प्रतिनिधी उपस्थित होते. दूध उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलै महिन्यात राज्यसरकारने घेतला. त्यानुसार आॅगस्ट महिन्याची रक्कम दूध उत्पादकांना देण्यात आली. सप्टेंबरच्या दहा तारखेपर्यंत उत्पादकांना ही रक्कम मिळाली. त्यानंतर आत्तापर्यतची रक्कम मिळालेली नाही. येत्या १५ डिसेंबर पर्यंत सरकारने अनुदान न दिल्यास अनुदानातून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला. मात्र त्यानंतर दुदाची रक्कम वाढविणार की नाही याबाबत मात्र भाष्य करण्यास संघाच्या प्रतिनिधींनी नकार दिला. मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यानंतर दुधाची किंमत वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.                       राज्यातील गायीच्या दुधाचे दर १७ ते २० रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ग्राहकाला मात्र ते ४० ते ४२ रुपये प्रतिलिटरनेच दूध मिळत होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी १६ जुलैला राज्यव्यापी दूधबंद आंदोलन केले होते. दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतून देणे, दुधाने जनावरांना आंघोळ घालणे, दुधाचे मोफत वाटप करणे, दुग्धाभिषेक करणे अशा विविध मार्गाने राज्यात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर १९ जुलैच्या रात्री दूध कोंडी फुटली. त्यात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नंतर उत्पादकांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ आणि म्हशीला ३६ रुपये देण्यात येत आहेत.

टॅग्स :PuneपुणेmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाFarmerशेतकरी