भोरमधील शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST2021-01-25T04:12:03+5:302021-01-25T04:12:03+5:30
यासंदर्भात आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले की, पुतळ्याच्या सर्व बाजूंनी कंपाउंड वॉल, आकर्षक विद्युत रोषणाई, गार्डन व हायड्रॉलिक ...

भोरमधील शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू
यासंदर्भात आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले की, पुतळ्याच्या सर्व बाजूंनी कंपाउंड वॉल, आकर्षक विद्युत रोषणाई, गार्डन व हायड्रॉलिक शिडी इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी १० लाख खर्च येणार असून एक सुंदर स्मारक निर्माण होणार आहे. युद्धपातळीवर काम सुरू असून, शिवजयंतीच्या अगोदर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यामुळे भोर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
माजी आमदार अनंतराव थोपटे यांनी १९९९ साली चौपाटी येथे अश्वारूढ पुतळा उभारला आहे. मात्र अनेक वर्षे झाल्याने परिसराची दुरुस्ती करणे गरजेचे होते. शिवाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास स्वच्छता करण्यासाठी वरती जाण्यास शिडी नव्हती. त्यासाठी हायड्रॉलिक शिडी बसवली जाणार असून, दगडी कंपाऊड वाॅल बांधण्यात येणार आहे. ऐतिहासिक पद्धतीने काम होणार असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले.
२४ भोर