शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फक्त बघितले म्हणून लाथाबुक्क्यांनी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:49 IST

धायरी येथील घटना; पाच जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धायरी : वाढदिवसाची पार्टी सुरू असताना एकाने फक्त बघितले म्हणून त्याला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात गणपतसिंह मेरावी (वय: ३८ वर्षे, रा. लेबर कॅम्प धायरीपुणे, मूळ: मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धायरी येथील डी.एस.के. स्कुलजवळ घडली. याप्रकरणी जखमीचा मित्र सुकलसिंह मसराम (वय ३५ वर्षे रा. लेबर कॅम्प, धायरी, पुणे) यांनी तक्रार दिल्याने पाच जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील डी.एस.के. स्कुलजवळ असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये लेबर कॅम्प आहे. त्याठिकाणी काही मध्यप्रदेश भागातील कामगार राहतात. ते सर्वजण सेंट्रिंगची कामे करतात. लेबर कॅम्पपासून पाचशे मीटर अंतरावर सनी चव्हाण याचा वाढदिवस करण्यासाठी तेथे त्याचे काही मित्र जमले होते. यावेळी गणपतसिंह मेरावी याने त्यांच्याकडे बघितले म्हणून त्याला पाच जणांनी मिळून ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडला. दरम्यान तो निपचित पडल्याचे पाहून या पाच जणांनी तेथून धूम ठोकली. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमी गणपतसिंह मेरावी याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून अद्यापही तो शुद्धीवर आला नसल्याची माहिती मिळते आहे. या घटनेत पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारी