शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: पत्नीवर वारंवार संशय घेत तिला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मंचरला एकाला अटक करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: पत्नीवर वारंवार संशय घेत तिला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मंचरला एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

सचिन लक्ष्मण रोकडे (रा. देवगाव, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याची पत्नी जयश्री रोकडे हिने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सचिन रोकडे हा वारंवार जयश्री यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करायचा. यामुळे त्या गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या माहेरी जाधववाडी (ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहत आहेत. ११ जानेवारीला त्या वळती (ता. आंबेगाव) येथील काकांच्या घरी आल्या असताना सकाळी सातच्या सुमारास पती सचिन रोकडे हा काकांच्या घरी आला. त्याने त्यांची मुलगी धनश्री हिला जयश्री यांच्याकडे देत घरी चल असे म्हणाला. मात्र, त्या तयार नव्हत्या. यामुळे त्याने चाकू काढून सोबत चल नाही तर येथेच कापून टाकेल, अशी धमकी देत जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यांना शिर्डी, शनिशिंगणापूर मुंबई येथे फिरविले. घरी देवगाव येथे परत आल्यावर दोन्ही मुलांना घरी पाठव, असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली.

देवगाव फाटा येथील वन विभागाच्या झाडीत नेत कोयत्याने मारहाण केली. यात जयश्री या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटका करत पळून घरी आल्या. घडलेला प्रकार फोनवरून दुसऱ्यांना सांगत पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर खबाले पुढील तपास करत आहे.