शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीकडून प्रियकराला मारहाण; दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 16:00 IST

दोघांमध्ये झालेल्या भांडणात तिने प्रियकराचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलल्याने जखमी होऊन प्रियकराचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून कळाले.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना त्यांची ओळख होऊन झाले होते प्रेम

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होते. त्यात दोघांमध्ये झालेल्या भांडणात तिने प्रियकराचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलले. त्यात जखमी होऊन दुसऱ्या दिवशी प्रियकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. शवविच्छेदनातून तरुणाचा गळा दाबून आणि मार लागून खून झाल्याचा प्रकार समोर आला असल्याने पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

रोहिणी रामदास युनाते (वय २४, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर) असे या तरुणीचे नाव आहे. तर सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय ३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोनलचा भाऊ निवास दाभाडे (वय ३०, रा. घोटा, ता. तिवसा, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की, रोहिणी युनाते ही मूळची बीडची राहणारी असून, दाभाडे हा अमरावतीचा राहणारा होता. दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना त्यांची ओळख झाली. गेल्या ३ वर्षांपासून ते फुरसुंगीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोघेही नोकरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणे होत होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांच्यात एकमेकांवरील संशयावरून भांडणे झाली.

तेव्हा रोहिणीने सोनलचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलून दिले. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. तो तसाच निपचित पडून होता. तसेच त्याला ताप आला असल्याने तो झोपला. दरम्यान, भांडणाच्या रागातून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी ती उठून निघून गेली. २८ ऑगस्टला तिच्या तब्येत खालावून त्यात त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात गळा दाबल्याने व डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यावरून चौकशी केल्यावर तपासात रोहिणी हिने गळा दाबल्याचे व भिंतीला ढकलल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट