अतिक्रमणास विरोध केल्याच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST2021-07-07T04:13:14+5:302021-07-07T04:13:14+5:30

पुणे : अतिक्रमण करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी मारहाण करणाऱ्या दोघांना लोणीकंद ...

Beaten for opposing encroachment | अतिक्रमणास विरोध केल्याच्या कारणावरून मारहाण

अतिक्रमणास विरोध केल्याच्या कारणावरून मारहाण

पुणे : अतिक्रमण करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी मारहाण करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. क्षितिज मारुती खुळे (वय २०), मारुती पोपट खुळे (वय ५० दोघेही रा. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फुलगाव परिसरात घडली. याप्रकरणी, काकूराम प्रभाकर खुळे वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करत असलेल्या आरोपींना विरोध केला. या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी काठी, लोखंडी चॅनलने मारहाण केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------

Web Title: Beaten for opposing encroachment