मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : विजय अंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST2021-03-01T04:11:40+5:302021-03-01T04:11:40+5:30

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. साहित्यिक ...

Be proud of Marathi language: Vijay Andhare | मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : विजय अंधारे

मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : विजय अंधारे

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वैज्ञानिक सी. व्ही.रमन यांच्या रमन इफेक्टस या शोधाप्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. अंधारे बोलत होते. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने रूपाली सोनावळे यांनी मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे संवर्धन, मराठीची सद्यस्थिती,मराठी भाषेचे सौंदर्य याविषयी मार्गदर्शन केले. भानुदास पाटोळे यांनी विज्ञानगीत सादर केले. विद्यालयातील कवयित्री अश्विनी सावंत यांनी स्वरचित कविता सादर केली. तृप्ती पाटील यांनी विज्ञानदिनाची माहिती दिली. यानिमित्ताने मराठी साहित्यिक पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल प्रदीप बागल यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे,पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, शिवाजी मोहिते, दिलीप क्षीरसागर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य विजय शितोळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता रूपनवर व सारिका टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले.

Web Title: Be proud of Marathi language: Vijay Andhare