शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 20:49 IST

कबुतरांना दाणे टाकणं काहींसाठी भूतदयेचा भाग असलं तरी त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देकबुतरांना धान्य टाकत असाल तर सावधान, आजारांना देत आहात निमंत्रण श्वसन विकारांचे प्रमाण वाढण्यास सुरुवात, महापालिका प्रशासनाची मिठाची गुळणी 

पुणे :कबुतरांना दाणे टाकणं काहींसाठी भूतदयेचा भाग असलं तरी त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही लोकांची ही भूतदया अनेकांना रुग्ण बनवत असल्याचे उदाहरण पुण्यातील काही भागात दिसून आले आहे. 

    शहरातील नदीपात्र किंवा तत्सम भागात अनेक जण कबुतरांना येऊन धान्य टाकतात. एवढेच नव्हे तर कोथरूड भागातही काही दुकानदार दुपारी कबुतरांना दाणे टाकतात. त्याबाबत विचारले असता काहींनी भूतदया तर एकाने त्यामुळे पुण्य लाभत असल्यामुळे वर्षानुवर्षे धान्य टाकत असल्याचे कारण दिले आहे. या विषयावर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा करण्यात आलेली आहे. या कबुतरांमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचे आरोग्य प्रभारींनीदेखील मान्य केले होते. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यसभेला दिले होते. या कबुतरांना एखादी विशिष्ट जागा देऊन तिथे धान्य देणे शक्य आहे का याचा अहवालही त्यांनी प्रशासनाकडे मागितला होता. दुसरीकडे महापालिका प्रशासन गप्प असताना नागरिकांना दमा, श्वसनाचे आजार, फुफ्फुसात जंतुसंसर्ग, खोकला, न्यूमोनिया असे आजार जडत आहेत. 

नदी पात्राच्याजवळ राहणारे विजय परांजपे यांनी आपल्याला काही दिवसांपूर्वी प्रचंड खोकला झाल्याचे सांगितले. मात्र हा खोकला खूप औषध घेऊनही बरा होत नसल्याने डॉक्टरांनी तपासणी करण्याचे सुचविले. त्यात कबुतरांमुळे फुफ्फुसाला जंतुसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.अखेर हवापालट करण्यासाठी बाहेरगावी गेल्यावर खोकला कमी झाल्याचे ते म्हणाले. 

   याबाबत उरोग व क्षयरोगतज्ज्ञ डॉ संजय गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना पक्षांच्या विष्ठेतून श्वसनाचे आजार होत असल्याचे सांगितले. पक्षांची विष्ठा सुकल्यावर त्याचे कण श्वासावाटे शरीरात जाऊन आजार बळावतात असेही त्यांनी मान्य केले.केवळ कबुतर नव्हे तर पोपट, लव्हबर्ड या पक्षांमुळेही आजार होत असतात. तर प्राण्यांच्या अंगावरील केसांमुळे त्वचेचे विकार होतात असेही ते म्हणाले. लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना असे विकार होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

 

 

 

 

 

   

 

टॅग्स :PuneपुणेriverनदीpigeonsकबुतरHealthआरोग्य