वेगाची मर्यादा तोडाल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:58+5:302021-09-02T04:25:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्याच्या परिवहन विभागाला रस्ता सुरक्षा निधीतून ७६ ‘इंटरसेप्टर’ वाहने देण्यात आली. या अंतर्गत ...

Be careful if you break the speed limit | वेगाची मर्यादा तोडाल तर खबरदार

वेगाची मर्यादा तोडाल तर खबरदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्याच्या परिवहन विभागाला रस्ता सुरक्षा निधीतून ७६ ‘इंटरसेप्टर’ वाहने देण्यात आली. या अंतर्गत बुधवारी (दि. १) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) ३ ‘इंटरसेप्टर’ वाहने देण्यात आली. हे वाहन वायुवेग पथकाला दिले असून त्यामुळे महामार्गावर निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनावर कारवाई करणे सोपे होईल. या वाहनांमध्ये लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ ॲॅनलायझर, टिन्ट मीटरची सोय असल्याने नियम मोडणाऱ्यांवर आरटीओचे वायुवेग पथक कारवाई करणार आहे.

रस्ता सुरक्षा निधीमधून परिवहन विभागाने ही सर्व वाहने खरेदी केली असून, त्यात विविध उपकरणे लावली आहेत. त्यासाठी १३ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यात स्कॉर्पियो गाड्यांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी पुणे आरटीओ आवारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर व संजय ससाणे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करण्यात आली.

वाहनातील लेझर स्पीडगनमुळे रस्त्यांवरील अनियंत्रित वाहनाची गती जाणून घेता येईल. कुणी मद्यपान करून वाहन चालवत असल्यास अल्कोहोल ब्रेथ ॲॅनलायझरने त्याला पकडता येईल. टिन्ट मीटरने कुणाच्या चारचाकी वाहनावरील काळी फिल्म नियमानुसार की नियमबाह्य हे कळेल. त्यामुळे परिवहन विभागाच्या कारवाईतही पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. या वाहनांना ठाणे आरटीओ कार्यालयाचे तात्पुरते पासिंग केले आहे. नंतर ह्या वाहनांना पुणे आरटीओचे पासिंग होईल. पुणे आरटीओकडे चार वायुवेग पथक असून, गुरुवारपासून ते नव्या वाहनातून काम पाहतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांनी सांगितले.

Web Title: Be careful if you break the speed limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.