शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

सावधान! 'फॉर्म १६' चा फसवा मेल आलाय? हॅकर्सकडून होतोय माहिती चोरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 1:22 PM

सध्या आयटी रिटर्न भरण्याची आणि त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्याची करदात्यांची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देफॉर्म १६ चे फसवे मेल येत असतील तर सावध राहण्याचा सायबर तज्ज्ञांकडून इशारा आयटी रिटर्न भरताना 'फॉर्म १६' हे मानले जाते महत्वाचे कागदपत्र

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या आयटी रिटर्न भरण्याची आणि त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्याची करदात्यांची धावपळ सुरू आहे. आयटी रिटर्न भरताना 'फॉर्म १६' हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते.  सायबर भामट्यांनी आता फॉर्म-१६ च्या नावाने सुद्धा फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे फॉर्म १६ चे फसवे मेल येत असतील तर सावध राहण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

हॅकर टोळ्यांकडून ई-मेलद्वारे सर्व लोकांना एकाच वेळी संपर्क केला जातो. एच.आर. विभागाकडून मेल पाठवला गेलाय, असे भासवण्यात येत आहे. मेलवर एक लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करताच वैयक्तिक माहिती मागितली जाते. आयकर विभागाने फॉर्म - १६ साठी नवी व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म - १६ डाऊनलोड करा, असे ई-मेल मध्ये सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीने लिंकवर क्लिक केल्यास त्याला अशा पेजवर नेले जाते, जेथे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक डिटेल अशी सर्व माहिती मागितली जाते. या माहितीवरून आपल्या बँक अकाउंट वरून सर्व पैसे दुसऱ्या अकाउंटवर वळते केले जाऊ शकतात. तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्याची विनंती करून तुमचा नंबर हॅकर टोळ्यांकडे जाऊ शकतो. जेणेकरून ज्या बँक अकाउंटला तुमचा मोबाइल नंबर कनेक्ट आहे त्याचा ओटीपी मिळवून बँक अकाउंटमधील सर्व पैसे जाऊ शकतात, अशी माहिती सायबरतज्ज्ञ रोहन न्यायाधीश यांनी दिली.

-----हॅकर्स कंपनीच्या नावाशी मिळते-जुळते मेल बनवतात आणि त्याच्या मदतीने ईमेल शूट केले जातात. विविध प्रलोभने दाखवून ई-मेल मधील लिंकवर क्लिक करण्यास प्रवूत्त केले जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यास सिस्टिम हॅक होते आणि सर्व माहिती या हॅकर्सपर्यंत पोहोचते. लिंकवर क्लिक करताच मोबाइल किंवा कॉम्प्यूटरमध्ये एखादा बग इन्स्टॉल होतो, जो पूर्ण सिस्टमची माहिती नंतर रिमोट लोकेशन्सला पाठवतो.

- रोहन न्यायाधीश, सायबर सुरक्षा विशेषज्ञ---------काळजी कशी घ्यावी?

१. सहसा पर्सनल आणि कॉर्पोरेट ई-मेल अकाउंट एकाच मोबाइलमध्ये वापरू नये.२. बँकिंग अँप्लिकेशन्स मोबाइलमधून वापरायचे टाळावे. कारण मोबाइल हॅक झाला तर मोबाइलमध्ये असेलेले बँकिंग अँपसुद्धा धोक्यात येऊ शकते.३. ई-मेल / सोशल मीडियासाठी टू वे ऑथेंटिकेशनचा वापर करा. पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.४. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ५. अज्ञात इंटरनेट वापरू नका. ६. लॅपटॉप आणि मोबाईल साठी फायरवॉल आणि अँटी व्हायरस विकत घेऊन इन्स्टॉल करावा.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीIncome Taxइन्कम टॅक्स