शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सावधान! गुळात चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ, ५ लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 13:00 IST

गुळ खरेदी करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देगुळाला काळसर व पिवळा रंग येण्यासाठी त्यात अखाद्य रंगाची भेसळ करून आकर्षक रंग दिला जातो

पुणे : दिवाळीच्या सणानिमित्तने घराघरात चविष्ट अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या गुळामध्ये चक्क बैलांच्या शिंगाला लावल्या जाणा-या रंगाची भेसळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुळ खरेदी करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’असे म्हणत दिवाळीचे आगमन होत असताना पुरळपोळीच्या स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा-या गुळात भेसळ होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले. त्यातही काही गु-हाळ चालक विना परवाना गुळ तयार करत असल्याचे दिसून आले.पुणे जिल्ह्यात सहायक आयुक्त संजय नारगुडे व एफडीएचे राज्याचे विधी अधिकारी संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 5 लाख 27 हजार रुपये किमतीचा 15 हजार 487 किलो भेसळयुक्त गुळ जप्त करण्यात आला.

गुळाला काळपट व पिवळसर रंग येण्यासाठी दौंड व केडगाव परिसरातील काही गु-हाळामध्ये भेसळ केली जात असल्याचे समोर आले. काही गु-हाळामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश व बिहार येथील कर्मचारी काम करत असून त्यांच्याकडून बैलांच्या शिंगाला लावला जाणारा रंग गुळात भेसळ केला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

गुळात कशाची भेसळ ?

गुळाला काळसर व पिवळा रंग येण्यासाठी त्यात अखाद्य रंगाची भेसळ करून आकर्षक रंग दिला जातो.त्यासाठी काही ठिकाणी बैल पोळ्याला जनावरांच्या शिंगाला लावला जाणारा रंग वापरला जात आहे.

कोण करते ही भेसळ ?

गु-हाळ चालकांनी गुळ तयार करण्यासाठी नेमलेल्या कर्मचा-यांकडून गुळाला काळसर किंवा पिवळा रंग येत नाही तोपर्यंत त्यात अखाद्य रंगाची भेसळ करतात.

ओळखायचे कसे ?

एफडीएकडून प्रमाणित केलेल्या रंगाचाच वापर गुळांत करता येतो. तसेच हा रंग गुळ पाण्यात टाकल्यानंतर वर येत नाही. त्यामुळे गुळात भेसळ झाली असल्याचे ओळखण्यासाठी संबंधित गुळ पाण्यात टाकून पाहिल्यास गुळात वापरण्यात आलेला रंग वर येतो. यावरून भेसळयुक्त गुळ ओळखता येतो.

''केडगाव येथील दिलदार मुर्तुजा गुल उद्योग आणि समर्थ गुळ उद्योग, तसेच पिंपळगाव येथील लक्ष्मी गुळ उद्योग, कापरे गुळ उद्योग आणि कानरखेड मधील जानवी गुळ उद्योगावर कारवाई करण्यात आली आहे असे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.''

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी 2021Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागPoliceपोलिसSocialसामाजिक