पासमध्ये बनवाबनवी

By Admin | Updated: February 7, 2017 03:20 IST2017-02-07T03:20:55+5:302017-02-07T03:20:55+5:30

प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दिल्या जाणाऱ्या विविध पासेसमध्ये बनवाबनवी वाढत चालल्याचे आढळून आले आहे

Bawnabanei nearby | पासमध्ये बनवाबनवी

पासमध्ये बनवाबनवी

पुणे : प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दिल्या जाणाऱ्या विविध पासेसमध्ये बनवाबनवी वाढत चालल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित प्रवाशांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
‘पीएमपी’कडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांना विविध प्रकारचे पास दिले जातात. त्यामुळे एक दिवसाच्या पासपासून वार्षिक पासचाही समावेश आहे. पास देताना प्रवाशांकडून ओळखपत्र घेतले जाते. विद्यार्थी असल्यास संबंधित महाविद्यालयाचे पत्र आवश्यक असते. त्यानंतरच पीएमपीकडून पास दिला जातो. त्यासाठी शहरांत ५० हून अधिक ठिकाणी पास केंद्र असून, येथूनच सर्व पासेसचे वितरण केले जाते. मात्र, अनेक प्रवाशांकडून पासेसच्या तारखांमध्ये खाडाखोड करून किंवा कलर झेरॉक्स वापरून गैरप्रकार करून पासेस वापराचे प्रकार आढळून येत आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. सध्या अशा पासधारकांवर पीएमपी प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईनंतर पुन्हा संबंधित प्रवाशांना पास दिला
जातो. (प्रतिनिधी)क

Web Title: Bawnabanei nearby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.