शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 21:02 IST

Koregaon Bhima : गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकोकणे यांनी लिहिलेल्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस - सत्य की विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे :  ‘कोरेगाव भीमा’ येथे 1 जानेवारी 1818 रोजी झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एका विशिष्ट जाती समुहामध्ये झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत. महाराष्ट्र, गुजरातसह बराच मोठा भाग इंग्रजांच्या गुलामगिरीत ढकलणारी ही घटना शौर्य दिन म्हणून साजरी करणे गैर आहे. ही समतेची लढाई नव्हती. गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अ‍ॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे.

कोकणे यांनी लिहिलेल्या ‘कोरेगाव (भीमा) शौर्य दिवस - सत्य की विपर्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयस्तंभाचे परंपरागत व्यवस्थापक कॅप्टन (नि.) बाळासाहेब जमादार-माळवदकर, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष दीपक बलसूरकर, समाजवादी कवयित्री सरिता कुरुंदवाडे, राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी कोकणे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे याविषयाची चर्चा अधिक झाली. त्यामुळे मी या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरविले. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर हे पुस्तक लिहिले असून इंग्रजांचे अभिलेख, संदर्भ साहित्य, पत्रव्यवहार आदींचा अभ्यास केला आहे. जर ही लढाई समानतेची होती; तर लढाईनंतर समानता आली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इंग्रज अधिका-यांनी वरिष्ठ अधिका-यांकडे लढाईबाबत दिलेल्या तपशिलामध्ये एका जाती समुहाचा किंवा तशा आशयाचा उल्लेख नाही. या लढाईत लढलेल्या तीन तुकड्यांपैकी इंग्रजांच्या घोडदळाच्या तुकडीचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. त्यामध्येही कोणताही उल्लेख नाही. गौतम बुद्धांपासून आजवर समतेसाठी झालेल्या लढाया या अहिंसेच्या मार्गाने झाल्या आहेत. प्रबोधनामधून परिवर्तन असा त्यांचा सूर होता. परंतु, कोरेगाव भीमा येथे हिंसात्मक लढाई केली गेली हा इतिहास खोटा असल्याचे कोकणे म्हणाले.

माळवदकर म्हणाले, 1 जानेवारी 1818 ची लढाई ही ‘डिफेन्स वॉर’ होती. 1822 मध्ये याठिकाणी जयस्तंभ उभारण्यात आला. या लढाईत शहीद झालेल्या, जखमी झालेल्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या खंडोजी जमादार-माळवदकर यांचा मी सहावा वंशज आहे. त्यांना ब्रिटीशांनी जयस्तंभाचा प्रमुख म्हणून नेमले होते. जमिनही दिली होती. या ठिकाणी धार्मिक कृती करु देऊ नका. तशी कृती घडल्यास जमादार आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश इंग्रजांनी आम्हाला दिलेले होते. तरीसुद्धा याठिकाणी दरवर्षी शौर्यदिवस साजरा केला जातो. कोणत्याही जातीशी या लढाईचा संबंध नाही. इंग्रजांनी हा जयस्तंभ का उभारला याची माहितीच लोकांना नसल्याचे माळवदकर म्हणाले.

मी पक्का समाजवादीमी पक्का समाजवादी आहे. दंगलीनंतर मला या विषयावर अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर पुस्तक तयार झाले आहे. विषय वादग्रस्त असल्याने कोणीही प्रस्तावना लिहिण्यास किंवा प्रकाशक मिळेना. शेवटी मीच पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाला प्रस्तावना नाही. मला पुढील पाच-दहा वर्षे संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. परंतु, जे सत्य आहे ते मांडले पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्वांना मते मांडण्याचा अधिकार आहे.- अ‍ॅड. शिवाजी कोकणे, लेखक

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे