शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात बत्ती गुल! देहूत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 14:15 IST

पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही...

देहूगाव (पुणे) : येथील माऊली सोसायटी, भीमाशंकर सोसायटी या भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे कुटुंब ऐन गणेशोत्सवात अंधारात गेल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या देहू येथील विभागीय कार्य़ालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मोर्चात महावितरणच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मात्र पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

येथील कार्यालयात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नव्हता. शेवटी देहूरोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांनी निगडी येथील विभागीय अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क करून परिस्थितीची जाणीव करून देऊन तात्काळ घटनास्थळी येण्यास सांगितले. या फोनाफोनीमध्ये दोन तास नागरिकांना ऐन गौरी अवाहनाच्या दिवशीची रस्त्यावर ठाण मांडावे लागले.माऊली सोसायटी व सदगुरू सोसायटीमध्ये गेल्या दोन वर्षापासून लाईट वारंवार जाणे, होलटेज कमी असणे हा तक्रारी आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लाईट जात आहे. याबाबत येथील कार्य़ालयात लेखी तक्रारी दाखल केल्या निवेदने दिली. 

यावेळी देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, बांधकाम सभापती योगेश काळोखे, माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, यांच्यासह विनोद जोशी, अनील काळे, शरद पवार, रमेश डोंगरे, मुरलीधर तायडे, ज्योती तायडे, सविता पंडीत, मनिषा चौधरी, मारुती पाटील, सुरेंद्र शर्मा, सुरेश गावडे, कल्पना पिसाळ, देवा गिरी यांच्यासह या सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होता.

यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांच्याकडे नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी निवेदन दिले. यानंतर महावितरणे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी या सोसायटीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या भागात सध्या नगरपंतायतीच्या वतीने केबल टाकून देण्यात येणार आहे व महावितरण केवळ कैबल जोडून देणार असल्याची माहिती बांधकाम सभापती योगेश काळोखे यांनी सांगितले. 

या भागात नवीन घरे वाढलेले आहेत. मोठ्या प्रमाणात वीजपंप आहेत. ते सुरू केल्यानंतर विद्यूत वाहिन्यांवर लोड येऊन शॉट होतात. या भागात लोड पुर्वी ईतकाच आहे. त्यामुळे ही समस्या येत आहे. या भागात सध्या तातडीने उपलब्ध केबल टाकून विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगितले.-मिलिंद चौधरी अतिरिक्त कार्य़कारी अभियंता

टॅग्स :Puneपुणेdehuदेहू