शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; मित्राच्या पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेल करत पैसेही उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 11:39 IST

मित्राला राहायला जागा नव्हती म्हणून स्वतःच्या घरात काही दिवसासाठी त्याला ठेवून घेतले

पुणे/किरण शिंदे : गावाकडील मित्र म्हणून त्याला पुण्यात आणले. पुण्यात एका ठिकाणी नोकरीही मिळवून दिली. राहायला जागा नव्हती म्हणून स्वतःच्या घरात काही दिवसासाठी त्याला ठेवून घेतले. मात्र याचा त्याने गैरफायदा घेतला. मित्राची पत्नी अंघोळ करत असताना लपून त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत पैसेही उकळले.  27 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार या महिलेच्या पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा पती लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  या महिलेचा पती वाघोली परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करतो. वाघोली परिसरातच ते भाड्याच्या घरात राहतात. या महिलेच्या पतीने गावाकडच्या मित्राला काम मिळवून देण्यासाठी पुण्यात आणले होते. एका पेट्रोल पंपावर त्याला नोकरी देखील मिळाली होती.. मात्र राहण्यासाठी जागा नसल्याने त्याला स्वतःच्या घरात ठेवून घेतले. मात्र आरोपी तरुणाने याचा गैरफायदा घेतला. 

मित्र कामाला गेल्यानंतर फिर्यादी आंघोळ करत असताना त्याने नकळत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.  हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. सुरवातीला फिर्यादीने भावाकडून इमर्जन्सी कारण सांगत पन्नास हजार रुपये घेऊन आरोपीला दिले. मात्र त्यानंतरही आरोपीने आणखी साडेतीन लाख रुपये दे अन्यथा बदनामी करेल अशी धमकी दिली. 

या सर्वाला कंटाळून फिर्यादीने भावाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भावाने आरोपीला समजावूनही सांगितले. परंतु तो आणखी पैशाची मागणी करत पिडीतेला त्रास देऊ लागला. अखेर दोघांनी मिळून पतीला हा सर्व प्रकार सांगितला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरल