शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

एनडीए रचणार आज नवा अध्याय; महिलांची पहिली तुकडी होणार पासआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 07:23 IST

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा दीक्षांत सोहळा

पुणे : डोळ्यात देशसेवेची स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा १४८वा दीक्षांत सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. या सोहळ्यावेळी एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. पहिल्यांदाच तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेली महिला कॅडेट्सची तुकडीदेखील यंदा एनडीएममधून पास आउट होणार आहे. महिलांच्या तुकडीत १७ महिला कॅडेट्स असून, त्या ३० मे रोजी होणाऱ्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

सन २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर यूपीएससीमार्फत २०२२ मध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एनडीएमध्ये प्रवेश खुला करण्यात आला. या निर्णयाच्या ३ वर्षांनंतर आता या महिला कॅडेट्सनी आपले कठोर प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.

महिलांची वाढती संख्या 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मार्चमध्ये संसदेत माहिती देताना, २०२२ पासून आजपर्यंत एनडीएमध्ये १२६ महिला कॅडेट्सनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी १२१ अजूनही प्रशिक्षण घेत आहेत. पाच कॅडेट्सनी वैयक्तिक कारणांमुळे एनडीए सोडले असल्याची माहिती दिली होती.

महिला कैडेट्सपैकी ३५ हरयाणा, २८ उत्तर प्रदेशमधून, १३ राजस्थानमधून, तर ११ महाराष्ट्रातून आहेत. कर्नाटकातील एक, केरळमधील चार कॅडेट्स प्रशिक्षण घेत आहेत.

शिस्त, नेतृत्व, बौद्धिक आणि व्यावहारिक शिक्षण 

एनडीएमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे अत्यंत कठोर, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी घेणारे असते. यामध्ये तिन्ही सैन्य दलांसाठी शिस्त, नेतृत्व, बौद्धिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जाते. 

३० मे रोजी एनडीएमध्ये होणारी पासिंग आउट परेड ही केवळ एका बॅचच्या यशाची नव्हे, तर संपूर्ण भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

माझ्या घरात कुणीही लष्करात नव्हते. आई-वडील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात, भाऊ आयटीमध्ये आहे. मी एनडीए प्रवेशासाठी संधी ही जाहिरात बघितली आणि अर्ज केला. तीन वर्षे जिद्दीने मी अभ्यासक्रम पूर्ण केला. एनडीएच्या प्रशिक्षणामुळे माझे व्यक्तिमत्त्वच बदलले- इशिता शर्मा, कॅडेट 

टॅग्स :nda puneएनडीए पुणेIndian Armyभारतीय जवान