शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बेसिक पोलिसिंग, तंत्रज्ञानाच्या वापरावर देणार भर,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  यांचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 14:24 IST

पुणे हे सुंदर शहर आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले हे शहर आता आयटीचे हबही झाले आहे. अशा शहरात काम करण्यासाठी संधी मिळणे, ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.

पुणे - पुण्यात काम करताना आपण बेसिक पोलिसिंग आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार आहे. पुण्यासारख्या शहरात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो, असे नूतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून रविवारी अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते ‘लोकमत’ शी बोलत होते.  गुप्ता म्हणाले, पुणे हे सुंदर शहर आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले हे शहर आता आयटीचे हबही झाले आहे. अशा शहरात काम करण्यासाठी संधी मिळणे, हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. डॉ. व्यंकटेशम यांनी सुरु केलेले सर्व डायनामिक उपक्रम यापुढेही सुरु राहतील. त्यात आणखी भर टाकली जाईल. शहरातील कायदा सुव्यवस्था आबादी राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग राबविण्याचा आपला विचार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कामात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, याकडे आपले लक्ष असणार आहे. चांगल्या कामाला पुणेकर नेहमीच साथ देतात. आतापर्यंत पुणेकरांनी जसे पोलिसांना नेहमीच सहकार्य केले, तशीच अपेक्षा यापुढील काळातही पुणेकरांचे सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे. पुढील चार पाच दिवस पुणे व पुणे पोलीस दलातील विविध घटकांचा अभ्यास करुन प्रथम आपण सर्व माहिती घेणार असून त्यानंतर कामाची रुपरेषा निश्चित करणार आहे. सर्व माहिती घेतल्यानंतरच अधिक बोलणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले. अमिताभ गुप्ता हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मुळचे राहणार आहेत. लखनौमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कानपूरच्या आयआयटीमधून बी. टेक मध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएस केडरमध्ये १९९२ मध्ये निवड झाली. तरुण वयात आपल्याला नेमके काय व्हायचे, हे नक्की होत नाही. तेव्हापासून आपल्याला पोलीस सेवेचे आकर्षण होते, असे त्यांनी सांगितले.पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन माहिती घेतली.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे