शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या रुग्णालयांत टॅमीफ्लूचे सरसकट वाटप

By admin | Updated: March 3, 2015 01:12 IST

औषधांचा कोर्स अर्धवट सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत या औषधांना स्वाइन फ्लूचे विषाणू न जुमानण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे : पुण्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लाहे. त्यामुळे सर्दी-खोकला, घसादुखी होताच नागरिक दवाखान्यांकडे धाव घेत आहेत. त्यापैकी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असलेल्यांना टॅमीफ्लू औषधे देणे गरजेचे असताना पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांना सरसकट या औषधांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे रुग्णांकडून औषधांचा कोर्स अर्धवट सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत या औषधांना स्वाइन फ्लूचे विषाणू न जुमानण्याची भीती निर्माण झाली आहे.दिवसाकाठी दोन हजारांपर्यंत रुग्ण रोज स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जात आहेत. प्रत्येक रुग्णाची पूर्ण तपासणी करून त्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून येत असली, तर प्रतिबंधात्मक टॅमीफ्लू औषधे रुग्णाला देण्याची सूचना आहे. मात्र, प्रत्यक्षात पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सरसकट टॅमीफ्लू दिली जात आहेत. यामुळे थोडे बरे वाटताच रुग्ण मध्येच औषध घेणे बंद करीत आहेत. यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंमध्ये या औषधांविरोधात प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.याबाबत राज्य आरोग्य विभागाच्या सहसचांलिका डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, ‘‘रुग्णांनी या औषधांचा पूर्ण कोर्स केला नाही, तर स्वाइन फ्लूच्या विषाणूंमध्ये या औषधांविरोधात प्रतिरोध निर्माण होण्याचा धोका आहे.’’खासगी डॉक्टरच्या पिस्क्रिप्शनवर कोणतीही विचारणा न करता टॅमीफ्लू औषधे देत असल्याचे चित्र नायडू रूग्णालयात दिसून येत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ४सन २००९ मध्ये स्वाइन फ्लूने थैमान माजविल्यानंतर केंद्र शासनाने स्वाइन फ्लूच्या उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. ४यामध्ये ज्या रुग्णांना स्वाइन फ्लू झाला आहे व ज्यांना होण्याची शक्यता आहे अशांनाच केवळ औषधे देण्यात यावीत, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, पालिकेने सरसकट सर्वांना औषधे देऊन या मार्गदर्शकत तत्त्वांनाच हरताळ फासला आहे.स्वाइन फ्लूची लक्षणे व प्रसार ४सर्दी-खोकला, अंगदुखी, ताप, घसा दुखणे ४आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून प्रसार ४मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुफ्फुस-मुत्रपिंड आजाराच्या व्यक्तींना अधिक धोका ४गर्भवती, लहान मुले, लठ्ठ व्यक्तींनाही धोका आजार टाळण्यासाठी ४हात साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा ४पौष्टिक आहार घ्या ४लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा ४पुरेशी झोप व विश्रांती घ्या ४भरपूर पाणी प्या ४शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रूमाल धरा ४लक्षणे दिसताच विनाविलंब डॉक्टरांकडे जा