शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

बारामतीचा जिरायती भाग : ज्वारीची कणसे काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 03:14 IST

बदलत्या तापमानामुळे बारामतीच्या जिरायती भागात जोमात असलेल्या ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकटा पसरलेला दिसून येतो. गेल्या ४ ते ५ वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.

बारामती - बदलत्या तापमानामुळे बारामतीच्या जिरायती भागात जोमात असलेल्या ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकटा पसरलेला दिसून येतो. गेल्या ४ ते ५ वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, तापमानातील चढउताराने मालदांडीवर चिकट्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकºयांमधुन व्यक्त होत आहे.बारामतीच्या जिरायती भागात मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड करण्यात येते. यंदा गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत जिरायती भागात पर्जन्यमानाचे प्रमाण समाधानकारक आहे. त्यामुळे शेतकºयांनी हक्काचे पीक समजल्या जाणाºया मालदांडी ज्वारीची लागवड केली. ही लागवड चांगली झाली. ज्वारी पिकेदेखील जोमदार आली. पिके फुलण्याच्या अवस्थेत असताना तापमानातील बदलामुळे ज्वारी काळवंडली आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून असणाºया तापमानातील बदलाचा फटका येथील शेतकरी अनुभवत आहेत. रात्री, पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसा प्रखर ऊन अशा तापमानाला सध्या बारामतीकर सामोरे जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अचानक थंडीचे प्रमाण वाढल्याने पिकांवर चिकटा वाढला आहे. ज्वारीची कणसे फुलताना ज्वारीचे दाणे भरतात. मात्र, चिकट्यामुळे हे चित्र बदलले आहे. ज्वारीपिकाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये घट होणार आहे. शिवाय ज्वारीचा कडबा खराब झाला आहे. कडबा लालसर, काळपट झाला आहे. बागायती भागात अधिक पाणी दिलेले ज्वारीपीक अधिक खराब झाले आहे. जिरायती भागात ज्वारी पिकाच्या उंचीवर परिणाम झाला आहे.बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की बदलत्या हवामानामुळे ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यातून चिकट्याचे प्रमाण वाढले. याबाबत शेतकºयांना यापूर्वीच दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या ज्वारीपीक परिपक्व अवस्थेत आहे. त्यामुळे चिकट्यावर उपाययोजना करणे शक्य होणार नाही, असे बरकडे म्हणाले.कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, बाजरी पिकावर चिकटा वाढला आहे. सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी करू नये. रासायनिक औषधांऐवजी निमअकर् ाचा वापर करावा. या एकाच औषधामुळे भाजीपाल्यावरील भुरी रोगासह सर्व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.'मालदांडी फुलण्याऐवजी कोमातबारामतीचा जिरायती भाग मालदांडी ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये मिळणाºया ज्वारीचा दर्जा चांगला असतो. खाण्यासाठीही ज्वारी चांगल्या प्रतीची, पौष्टिक मानली जाते.४साहजिक याच पिकाच्या मोठ्या लागवडीस प्राधान्यदिले जाते. मावा किडीमुळे ज्वारीवर चिकटा पडला आहे.४यंदा हे पीक काळवंडल्यामुळे कोमात गेले आहे. त्यामुळे खाण्यासाठी ज्वारी मिळेल,पण जनावरांना चांगला चारा (कडबा) मिळणार नाही.कडब्याचेदर ढासळणार४ज्वारी पिकाबरोबरच त्या पिकाच्या कडब्यातून शेतकºयांना उत्पन्न मिळते. ज्वारीबरोबर कडब्याचे दुहेरी उत्पन्न शेतकºयांना मिळते. त्यावर पिकाच्या फायद्याची गणिते अवलंबून असतात.४३ हजार रुपये प्रतिशेकडाअसा कडब्याचा दर आहे.मात्र, यंदा हा दर दोन तेअडीच हजार रुपयांवर ढासळण्याची शक्यता आहे.४खराब कडब्याला कमी दर मिळण्याची भीती काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPuneपुणे