शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:40 IST

Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.

Baramati Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live:बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. स्वत: शरद पवार यांची ताकदही युगेंद्र पवारांच्या पाठीशी असल्याने बारामतीत यंदा अटीतटीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.

बारामती मतदारसंघातून  अजित पवार यांना एकूण १ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना अवघ्या ८० हजार ४५८ मतांवर समाधान मानावं लागलं. बारामती विधानसभेसाठी यंदा ३ लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २९ हजार ४०१ स्त्रिया, तर १ लाख ५२ हजार ९९६ पुरुष मतदार,तसेच इतर ११ मतदारांचा समावेश होते. यंदा एकूण ७१.५७ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये ६८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार तुलनेने यंदा मतदानामध्ये ३.२९ टक्के वाढ झाली होती. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. तर तत्कालीन भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती. पवार यांना त्यावेळी १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्याची सुरुवात लोकसभेपासूनच झाली. यामध्ये सुळे विरोधात उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्यात आले. यामध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता अजित पवारांनी दमदार कमबॅक करत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

सुप्यात अजित पवारांच्या विजयाचा जल्लोष

बारामती विधानसभा मतदार संघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लक्षवेधी लढतीत अजित पवार यांचा १,१६,१८२ मताच्या फरकाने विजय झाला. त्यामुळे सुपेकरांनी बाजार मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गुलालाची उधळण करीत फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला. 

मागील काही दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत घड्याळ चालणार की तुतारी, असे संदिग्घ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज सकाळपासून मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळपासून सुप्यातील चौका चौकात तरुणाईसह सर्वच जण निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून होते. त्यामुळे येथे सर्वांचेच मोबाईलमध्ये येणाऱ्या निकालाकडे लक्ष होते. मात्र या हाय होल्टेज ड्रामामध्ये अखेर अजित पवार यांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचा दारुण पराभव केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbaramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवार