शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 01:54 IST

संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत.

बारामती : संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत. या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि १४) मुंबईत जानकर यांंना निमंत्रण दिले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुध्दा जानकर यांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे रासपच्या सुत्रांनी सांगितले. या बैठकीत बारामतीच्या राजकीय तिढा सैल होण्याची रासपला आशा आहे.लोकसभा निवडणुक पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली खरी. मात्र, भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारा भाजपचाच उमेदवार द्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागील मागील महिन्यातच तशी घोषणा केली आहे. दुसरीकडे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या मतदारसंघातुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लोकसभा लढविण्यावर ठाम आहेत. रासपच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे तयारी देखील सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत कधी नव्हे एवढी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दौंडचे आमदार अ‍ॅड राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. शिवाय बारामती लोकसभेसाठी आता भाजपमधून बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, भीमराव तापकीर, वासुदेव काळे यांच्याबरोबर खुद्द आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक यांचे देखील नाव चर्चेत नव्याने आले आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.राज्यातील महायुतीचा घटकपक्ष म्हणून बारामती लोकसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचाच हक्क आहे. पक्षाचे वतीने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची या जागेची आग्रही मागणी आहे,असे रासप चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यासंदर्भात रासपचे प्रमुख जानकर यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे.गुरुवारी मुख्यमंत्र्यासमवेत बारामतीच्या जागेबाबत तोडगा निघेल,याबाबत रासप आशावादी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी देखील जानकर यांना चर्चेसाठी बोलावल्याचे दांगडे पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBaramatiबारामतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahadev Jankarमहादेव जानकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे