जिल्ह्यातील दुसरे मुख्य टपाल कार्यालय बारामतीत

By Admin | Updated: April 29, 2017 03:50 IST2017-04-29T03:50:02+5:302017-04-29T03:50:02+5:30

पुणे शहरानंतर जिल्ह्यातील दुसरे मुख्य टपाल कार्यालय बारामती शहरात दुसरे मुख्य टपाल कार्यालय असणार आहे.

Baramati, the second main post office in the district | जिल्ह्यातील दुसरे मुख्य टपाल कार्यालय बारामतीत

जिल्ह्यातील दुसरे मुख्य टपाल कार्यालय बारामतीत

बारामती : पुणे शहरानंतर जिल्ह्यातील दुसरे मुख्य टपाल कार्यालय बारामती शहरात दुसरे मुख्य टपाल कार्यालय असणार आहे. दि. १ मे महाराष्ट्र दिनापासून मुख्य टपाल कार्यालय म्हणून नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या टपाल कार्यालयाच्या अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर आदी तालुक्यांमधील ४१ उपटपाल कार्यालये व त्याअंतर्गत असणारी २१७ शाखा टपाल कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक अधीक्षक हनुमंत आगवणे व सुरेश ताटे यांनी दिली.
जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर म्हणून बारामतीचा उल्लेख होतो. बारामतीचे वाढते शहरीकरण लक्षात घेता, टपाल कार्यालयाने या ठिकाणी मुख्य टपाल कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टपाल विभागाने बारामती येथील उपमुख्य टपाल कार्यालयाचे मुख्य डाकघर करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे ग्राहकांना कोअर बँकिंग, इतर आर्थिक सुविधा, मेल सुविधांचा लाभ आता थेट बारामतीमधून घेता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Baramati, the second main post office in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.