शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम व्हायला हवे: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 19:29 IST

'पुढील काही दिवसात जिरायती भागात पाणी प्रश्न सुटलेला असेल...'

बारामती: कोणत्याही संस्था या नेटक्या व स्वच्छ कारभाराच्या असाव्यात. लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम या संस्थांमधून झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केले. बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. 19) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात मध्ये ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, राज्याच्या अनेक भागातून वेगवेगळ्या प्रशासकीय इमारतींसाठी माझ्याकडे अनेक लोक येत असतात. नूतन इमारतीची मागणी करताना बारामतीमध्ये जशी इमारत आहे तशी इमारत आम्हाला द्या. असे आवर्जून सांगतात. आज बारामती पंचायत समितीची इमारत पाहिल्यानंतर या बारामती पॅटर्नची माझी खात्री पटली. अशी इमारत पाहिल्यानंतर आगामी पंचायत समितीची निवडणूक ही सोपी असणार नाही. कारण प्रत्येकालाच इथे येण्याचा मोह होणार आहे.

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, माझ्या खात्याअंतर्गत बारामती पंचायत समितीसारखी इमारत उभी राहिली याचा मला अभिमान वाटतो. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांसाठी नगरोत्थान सारखी योजना आगामी अर्थसंकल्पात आणावी यासाठी आम्ही ग्रामविकास विभागातर्फे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांना प्रस्ताव देणार आहोत. पंचायत समिती ही कार्यकर्ते घडवणारी शाळा आहे. बारामती पंचायत समितीची इमारत पाहून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बारामती मधून इच्छुकांची संख्या वाढणार, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी लागेल, अशी मिश्किल टिप्पणीही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,  करण असोसिएट चे करण वाघोलीकर, कुणाल वाघोलीकर, उपसभापती रोहित कोकरे आदी उपस्थित होते. आभार पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे यांनी मानले.पुढील काही दिवसात जिरायती भागात पाणी प्रश्न सुटलेला असेल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेत. अनेक प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले ' आगामी काळात देखील बारामतीसाठी अनेक प्रकल्प योजना नियोजित आहेत. त्या सर्व कामांचे नियोजन  ठिकाणी सांगणार नाही. नाही तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री भरणे म्हणतील की अजित पवार हे फक्त बारामतीच्या अर्थमंत्री आहेत काय? पवार पुढे म्हणाले, आज पर्यंत बारामतीतील विरोधकांनी जिरायत पट्ट्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण केले. आगामी काळात जिरायत पट्ट्यातील पाणी योजना पूर्ण करून पन्नास वर्षापासून असलेला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे.   त्यामुळे येथून पुढे कोणी तुम्हाला पाणी मिळालं का असं सांगायला येणार नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफBaramatiबारामती