बारामती नगरपरिषदेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST2021-09-07T04:12:43+5:302021-09-07T04:12:43+5:30

भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे प्रांताधिकाºयांना निवेदन बारामती : येथील नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी भाजप अनुसुचित जाती ...

To Baramati Municipal Council | बारामती नगरपरिषदेला

बारामती नगरपरिषदेला

भाजप अनुसुचित जाती

मोर्चाचे प्रांताधिकाºयांना निवेदन

बारामती : येथील नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, मागील दोन-तीन महिन्यांपासून बारामती नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त आहे. तसेच प्रभारी अधिकारी सातत्याने गैरहजर असतात. त्यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी नगरपरिषदेस आवश्यक आहे. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने बारामतीमधील विविध प्रश्न, समस्या, विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने तत्काळ बारामती नगरपरिषदेमध्ये कायम स्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी साजन अडसुळ, अक्षय गायकवाड, संजय दराडे, शैलेश खरात, मयुर खंडाळे, सागर भिसे, सचिन मोरे आदी उपस्थित होते.

बारामती येथे भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना पदाधिकारी.

०६०९२०२१-बारामती-०३

Web Title: To Baramati Municipal Council