शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 21:57 IST

बारामतीत शिवसेना मेळाव्यात शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला.

बारामती - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर कधीही नव्हते एवढे मोठे संकट आले. मात्र ठाकरे यांनी अठरा अठरा तास काम करुन महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढले. यावेळी काही लोकांनी संघटना तोडफोड करण्याची भूमिका घेतली. त्यांना माहिती नाही, पक्ष फुटला असेल,काही लोक गेले असतील. मात्र, लाखो शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकार्यांचा शिवसेना मेळावा शनिवारी (दि ६) सायंकाळी बारामतीत पार पडला. यावेळी पवार बोलत हाेते. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे.त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून चुकीच्या प्रवृत्तीला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे. अनेक वेळा दिल्लीत चर्चा होते. शिवसेना राष्ट्रहिताचा विचार करते. शिवसेनेने कधीही दिल्लीसमोर स्वाभिमान कधीही झुकविला नाही. त्यामुळे हा संघर्ष लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या  प्रवृत्तीच्या विरोधात आहे. देशाच्या एक्याला सुरुंग लावला जात आहे, हे सहन केले जाणार नाही.

राष्ट्राच्या प्रश्नावर शिवसेना कधीही तडजोड करीत नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष वेगळ्या पद्धतीने जावू पाहत  आहेत.दहशत निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यांनी कितीही दमदाटी केली तरी त्यांच्या दमदाटीला भिक घातली जाणार नाही.बारामतीकडे देशाचे लक्ष आहे. दिल्लीत बारामतीची चर्चा होते,असे देखील यावेळी पवार म्हणाले.यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या मैत्रीला उजाळा दिला.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी  आजची लढाइ हि दडपशाही,दिल्लीच्या महाराष्ट्रावर होणार्या अत्याचाराविरोधातील स्वाभिमानाची लढाइ असल्याचे सुळे म्हणाल्या.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी हि निवडणुक हुकुमशाही विरोधात लोकशाही  टीकविण्यासाठीची निवडणुक असल्याची टीका केली. यावेळी युगेंद्र पवार, राजेंद्र काळे,अविनाश बलकवडे,शरदचंद्र सुर्यवंशी,सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते सचिन अहिर भाषणात म्हणाले, पुरंधरला नवीन वाघ तयार झाला आहे असे वाटत होते. पण तो वाघ खोक्याच्या मागे गेला की बोक्याच्या मागे गेला माहिती नाही,असा टोला अहिर यांनी विजय  शिवतारे यांचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा