Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:28 PM2024-04-05T20:28:28+5:302024-04-05T20:32:35+5:30

Baramati Lok Sabha Election 2024: मेळाव्यात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला.

Baramati Lok Sabha Election 2024 Harshvardhan Patil warns Ajit Pawar in front of Devendra Fadnavis | Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीमधील तिनही पक्षांचे नेते प्रचारासाठी बारामतीमध्ये येत आहेत तर सुप्रिया सुळेंसाठी पवार कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहे. दरम्यान, आता विजय शिवतारे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू केला आहे, तर भाजपाच्या हर्षवर्धन पाटील यांनीही प्रचार सुरू केला आहे. पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पहिल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते. यामुळे पाटील पवारांचा प्रचार करणार का अशा चर्चा सुरू होत्या. आज इंदापूर येथे भाजपाचा मेळावा झाला. या मेळाव्याला स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.  

Lok Sabha Election 2024 : मध्यप्रदेशमध्ये इंडिया आघाडीला धक्का! सपा उमेदवार मीरा यादव यांचा अर्ज रद्द, भाजपाच्या उमेदवाराचा मार्ग सोपा

यावेळी मेळाव्यात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. "महायुती महाराष्ट्रामध्ये आहे. वरिष्ठांनी निर्णय घेतला. आज या सगळ्या लोकांची एवढी अपेक्षा आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळला तर आमच्या मित्रपक्षांनीही पाळला पाहिजे. ही साधी माफक अपेक्षा आमची आहे, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी पवारांना दिला. 

"अजितदादा पवार, माझी, देवेंद्र फडणवीस यांच्यात अडिच तास बैठक झाली. या बैठकीत आपले प्रश्न, शंका मांडल्या. पाच पन्नास प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले. ते सगळे विषय साहेबांच्या कानावर गेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा झाल्यानंतर मी फडणवीस यांना इंदापूर तालुक्याच पालकत्व घेण्याची विनंती केली, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

"मोदींची ताकद वाढवण्यासाठी अजितदादांना सोबत घेतलं"

आज इंदापूरात झालेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, या देशात नरेंद्र मोदींच्या शिवाय कोणीही विकास करु शकत नाही. म्हणून आपणही मोदींसोबत गेलं पाहिजे असं त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचं मत होत होतं, म्हणून तो पक्षही आपल्यासोबत आला. एक संघटीत पद्धतीने मोदींची ताकद वाढवणं गरजेचं होतं. म्हणून अजितदादांना सोबत घेतलं. अनेक ठिकाणी आपला राष्ट्रवादीसोबत संघर्ष होता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्यासोबत काम कसं करायचं अशी एक भावना तयारी झाली होती. म्हणून आम्ही काही नेत्यांना सगळं सांगितलं. कालपर्यंत आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते आपल्यासोबत येऊन आपला अजेंडा राबवत असतील तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे, असंही देवेंद्र फडवीस म्हणाले. 

Web Title: Baramati Lok Sabha Election 2024 Harshvardhan Patil warns Ajit Pawar in front of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.