शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:48 IST

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Baramati Lok Sabha Election 2024:  बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील दिग्गज नेते या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात सभा घेतली. या सभेच्या आधी खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर प्रचार प्रमुख असलेले प्रविण माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, प्रविण माने, उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

इंदापूरच्या राजकारणात प्रविण माने हे महत्वाचे नेते मानले जातात. प्रविण माने हे जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला होता. पण, काही दिवसापूर्वी इंदापूरातील झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती.  यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या.  प्रविण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार प्रमुख आहेत.

मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे प्रविण माने आता शरद पवार यांची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळे