शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 11:00 IST

Baramati Lok Sabha Election Results 2019 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले.

बारामतीः राज्यातील सर्वाधिक चर्चेची आणि आकर्षणाची लढत म्हणजे बारामतीची लढत आहे.. त्याठिकाणी अमित शहा यांनी सभा घेऊन शरद पवारांनाच एकप्रकारे लक्ष केले होते..धोक्याची घंटा असलेल्या सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत कांचन कुलयांच्याकडून पिछाडीवर पडल्या होत्या मात्र त्यांनंतरच्या फेऱ्यांमध्ये सुळे यांनी हि पिछाडी भरून काढत निर्णायक आघाडी कुल यांच्या विरोधात घेतली ..  राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तिथे हॅटट्रिक मारण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे बारामतीच्या कन्या असलेल्या दौंडच्या कांचन राहुल कुल यांनी त्यांना तगडे आव्हान दिले आहे. कुल यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ताज्या  माहितीनुसार २९, ९१३ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१,९६,४३० मतं मिळाली असून कांचन कुल यांच्या पारड्यात १,६६,५१७ मतं पडली आहेत.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांना महादेव जानकरांनी चुरशीची लढत दिली होती. 2009 साली देशात तिसऱ्या क्रमांकाची व राज्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या सुळे यांना 2014 साली फक्त 69 हजार 666 एवढे मताधिक्य मिळाले. त्यांना एकूण 5 लाख 21 हजार 562 मते मिळाली होती, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मते मिळाली होती.-------------------

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपा