शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत आधीही झाली पवार विरुद्ध पवार लढत, शरद पवारांनी केला होता सख्ख्या भावाविरुद्ध प्रचार

By विवेक भुसे | Updated: April 4, 2024 10:05 IST

Baramati lok Sabha Constituency: बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लढत देत आहेत. त्याला पवार विरोधात पवार, असे स्वरूप आले आहे. मात्र, हे प्रथमच घडले, असे नाही.

- विवेक भुसेपुणे -  बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या लढत देत आहेत. त्याला पवार विरोधात पवार, असे स्वरूप आले आहे. मात्र, हे प्रथमच घडले, असे नाही. ६४ वर्षांपूर्वीही पवार विरुद्ध पवार, अशी लढत बारामतीमध्ये झाली होती. 

शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापच्या नेत्या. घरातील सर्व जण शेकापचे काम करत असत. शरद पवार हे पुण्यात शिकत असताना काँग्रेसचे काम करू लागले. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्त केले. बारामतीतून १९५७ मध्ये केशवराव जेधे निवडून आले होते. त्यांचे १९५९ मध्ये निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. काँग्रेसने त्यांचे पुत्र गुलाब जेधे यांना उमेदवारी दिली. शेकापने शरद पवार यांचे सख्खे भाऊ वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शरद पवारांची द्विधा मन:स्थिती झाली. एका बाजूला सख्खा भाऊ, तर दुसरीकडे पक्ष, अशी परिस्थिती होती. त्यांची ही मन:स्थिती वसंतराव पवार यांनी ओळखली. त्यांनी शरद पवार यांना सांगितले की, तू वेगळी विचारधारा अवलंबली आहे. त्या विचारधारेच्या उमेदवाराचा प्रचार कर. आई शारदाबाई यांनीही त्याला हरकत घेतली नाही. 

जेधे विरुद्ध पवार असा रंगला होता सामना पवार यांचे सर्व कुटुंबीय शेकापचे उमेदवार वसंतराव पवार यांचा प्रचार करत होते. दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेसचे उमेदवार गुलाब जेधे यांचा गावोगावी प्रचार करत होते.काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत जेधे विजयी झाले. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच शरद पवार यांनी आपल्या सख्ख्या भावाविरोधात प्रचार केला.

 

टॅग्स :baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४