बारामती, इंदापुरात विषाणुजन्य आजार
By Admin | Updated: July 19, 2014 23:02 IST2014-07-19T23:02:52+5:302014-07-19T23:02:52+5:30
बारामती व इंदापूर या तालुक्यांच्या ग्रामीण भागात विषाणुजन्य आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

बारामती, इंदापुरात विषाणुजन्य आजार
बारामती : बारामती व इंदापूर या तालुक्यांच्या ग्रामीण भागात विषाणुजन्य आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खराब हवामानामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढतच आहे.
ताप येणो, थंडी वाजणो,
सर्दी, डोकेदुखी, खोकला,थकवा येणो आदी लक्षणांनी रुग्ण त्रस्त आहेत.ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये हे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत आहेत. लहान मुलांपासुन सर्वच वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. दिवसभर ढगाळ हवामान राहत आहे. त्यामुळे विषाणुजन्य आजाराला पोषक वातावरण मिळत आहे.
याबाबत डॉ.मिलींद ठोंबरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की ,विविध वयोगटातील रुग्णांची दवाखान्यात वाढली आहे.
विषाणुजन्य आजाराबरोबरच डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. दौंड तालुक्यातील वास्ांुदे, बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर, तसेच इंदापुर तालुक्यातील मानकरवाडी, सणसर या ठिकाणी हे रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात डॉ चंद्रकांत पिल्ले यांनी सर्दी खोकल्याबरोबरच जुलाबाचे रुग्ण देखील आढळुन येत आहेत. नागरीकांनी पाणी उकळुन प्यावे.उघडय़ावरील पदार्थ खाऊ नयेत, आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
25 ते 3क् रुग्णांना डेंगीची लागण
विषाणुजन्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तर, सुमारे 25 ते 3क् रुग्णांना डेंगीची लागण झाली होती. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी.