शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari | देशी गोवंश सुधारणा प्रकल्प ऐतिहासिक क्रांतीकारक प्रयोग- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 20:27 IST

...शेतकरी अन्नदाता बनला पाहिजे

बारामती (पुणे) : बारामती येथे सुुरु झालेला देशी गोवंश सुधारणा प्रकल्प ऐतिहासिक आणि क्रांतीकारक प्रयोग आहे. या संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या दुग्धोत्पदनात तिपटीने वाढ होईल. परिणामी हा प्रकल्प राज्यापाठोपाठ देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलेल. आज झालेली नवीन युगाची सुरुवात देशातील शेतकऱ्यांचे जीवन बदलणारे तंत्रज्ञान ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या देशातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचे उदघाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी यांनी येथील शेती संशोधनाचे कौतुक केले. हा परीसर खूप सुंदर आहे. जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आणण्यासाठी घेतलेला पुढाकार सुखावणारा आहे.आजच्या प्रयोगामुळे ऐतिहासिक परिवर्तन होणार आहे. या प्रयोगाची सुरुवात बारामतीत झाली, त्यामुळे बारामतीकर भाग्यवान आहेत. नागपुरला भारत सरकारच्या वतीने पशुवैद्यकीय विद्यापीठाला १० कोटी रुपये दिले आहेत. १० कोटी रुपये निधी देऊन देखील दुध क्षेत्रात अपेक्षित सुरुवात झालेली नाही, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

आपल्याकडे देशी गाय ८ ते १० लीटर दुध देते. मात्र,आज सुुरु झालेल्या प्रकल्पामुळे ब्राझीलप्रमाणे एक गाय प्रतिदिन ६० लीटर उत्पादन देणे शक्य झाल्यास शेतकऱ्यांचे दुग्धोत्पादन वाढेल. केंद्र सरकार योजना तयार करणार आहे. केंद्र सरकारमधील मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तसेच माणसांप्रमाणे जनावरांसाठी देखील ‘सुपरस्पेशलीटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यामध्ये जनावरांवर कशा प्रकारे उपचार करता येतील, हे पाहणार असल्याचे गडकरी म्हणाले.

आज दुधाबाबत जगाच्या तुलनेत आपली आपल्याकडे दुध पावडरचे ४० ते ५० रुपये दर जास्त आहेत. माझा मुलगा एक्सपोर्ट इम्पोर्टचे काम करतो. त्याला ३५० कंटेनर दुध पावडरची ऑर्डर मिळाली आहे. तो ऑस्ट्रेलीया, न्युझीलंडमधून ती पावडर घेतो. आपल्याकडे तेवढ्या दरात ती पावडर परवडत नसल्याने ती पावडर इतर देशातून घ्यावी लागते, असे तो सांगतो. भविष्यात उत्पादन वाढल्यास दुध पावडरवर आपल्याला संशोधन करण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.

विदर्भात आपण तीन साखर कारखाने सुरु केले. मात्र, दरवर्षी मला ३० कोटी रुपये नुकसान होत असे. दहा वर्ष मी ३०० कोटी गमावले, कर्जबाजारी झालो. ऊसापासुन इथेनॉल तयार केले, या वर्षी प्रथमच फायद्यात आलो. तसेच आम्ही साखरेपासून साबण, हँडवॉश, फेसवॉश, हेअरवॉश, लाँड्री डिटर्जंट आदी गृहोपयोगी सहित्य बनविण्यास आम्ही सुरवात केली आहे. जगातील सात देशांमध्ये साखरेपासून तयार होणारी उत्पादने आम्ही पुरवतो. साखरेपासून डिटर्जंट केल्यामुळे  फायदा झाल्याचे गडकरी म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, जगात भारतात पशुधनाची संख्या प्रथम क्रमांकावर आहे, मात्र दुसऱ्या बाजुला दुध उत्पादनात कमतरता आहे. यासाठी जनावरांवरील संशोधनात काम करण्याची गरज आहे. दुधाचा व्यवसाय सुधारण्यासाठी आजचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात संपुर्ण देशात बारामतीत होत आहे. राज्यासह इतर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. त्यासाठी संस्थेने दुध क्षेत्रासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. २५ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभा केला आहे. येत्या दोन वर्षात दुध क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थेत चांगले बदल होतील, असा विश्वास पवार यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शेती आणि नविन प्रयोगाबाबत आस्था आहे. तसेच सबंधितांना मदत करण्याची त्यांची नेहमी भुमिका असते, अशा शब्दात पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त रणजित पवार यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, आमदार रोहित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी उपस्थित होते.

...शेतकरी अन्नदाता बनला पाहिजेऊस हे ‘एनर्जी क्रॉप’ आहे. ‘पवारसाहेबां’च्या मार्गदर्शनाखाली खुप बदल झाले आहेत. ऊसापासुन आपण इथेनॉल, बायोसीएनजी, एलएनजी, ग्रीन हायड्रोजन तयार केल्यास त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. देशात इंधनासाठी आपण १६ लाख कोटींचे आपण डिझेल, पेट्रोल आदी इंधन आयात करतो. त्यामुळे आता शेतकरी केवळ अन्नदाताच नाही, तर उर्जादाता बनला पाहिजे. अन्न खाणारे खुश असतात, मात्र भाव मिळत नसल्याने अन्न पिकविणारा चिंतेत आहे. तो देखील खुश असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी उर्जादाता झाल्यास आपले भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

...शेणापासून बनलेला पेंट लोकप्रियआपल्या मंत्रीपदाच्या काळात शेणापासून पेंट बनविण्याची सुरवात झाली आहे.आज देशात हा पेंट बनविणारे १५० युनिट आहेत.आपल्या नागपुर येथील निवासस्थानी हाच पेंट वापरला आहे. हा ऑईलपेंट सर्वाधिक चांगला आहे. त्याची ९ वैशिष्ठ आहेत. याबाबतचा प्रयोगशाळेचा अहवाल आहे. आपण शेणाने घर सारवतो, त्यामुळे दिवसेंदिवस शेणापासून बनलेला पेंट लोकप्रिय होत आहे. पेंट, खत आणि गॅस तयार करणे शक्य असल्याचे गडकरी म्हणाले. अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी यात लक्ष घालावे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवार