शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Baramati Accident News : माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:27 IST

जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात.

पुणे -  बारामती शहराला हादरवून टाकणाऱ्या एका भीषण अपघातात रविवारी सकाळी एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या धडकेत वडील आणि त्यांच्या दोन चिमुरड्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत जखमी अवस्थेतही वडिलांनी आपल्या लेकींना वाचवण्याचा केलेला प्रयत्न पाहून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.अधिकच्या माहितीनुसार, अपघातात ओंकार आचार्य (रा. मोरगाव रोड, बारामती), त्यांची १० वर्षांची मुलगी सई आणि ४ वर्षांची मधुरा, ही तिघंही दुचाकीवरून जात असताना (MH 16 CA 0212) भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी चाकाखाली आली आणि तिघंही चिरडले गेले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात. त्यांचा पोटाखालचा भाग पूर्णपणे गंभीररीत्या जखमी झाला होता. माझ्या लेकींना वाचवा  हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. काही क्षणांतच त्यांनी जागीच प्राण सोडला. सई आणि मधुरा यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, या दुर्घटनेतील दुःख अद्याप ओसरलेलंही नव्हतं, की आचार्य कुटुंबावर आणखी मोठा आघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ओंकार आचार्य यांचे वडील, राजेंद्र श्रीनिवास आचार्य (७०) यांचंही आज सकाळी निधन झालं.सेवानिवृत्त शिक्षक असलेले राजेंद्र आचार्य हे मधुमेहाने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आजारी असलेल्या वडिलांसाठी फळं आणण्यासाठीच ओंकार आपल्या दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर पडले होते. मात्र त्या छोट्याशा प्रवासात नियतीने संपूर्ण कुटुंब हिरावून नेलं.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातBaramatiबारामतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड