भरधाव टँकरच्या धडकेत बापलेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST2021-05-05T04:19:34+5:302021-05-05T04:19:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : सारोळा (ता. भोर) येथील पुणे-सातारा महामार्गाच्या सेवा रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या ...

भरधाव टँकरच्या धडकेत बापलेक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : सारोळा (ता. भोर) येथील पुणे-सातारा महामार्गाच्या सेवा रस्त्यावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील बापलेक ठार झाले आहेत. या प्रकरणी टँकरचालक अशोक दिनकर धाडवे (रा. सारोळा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तानाजी रामचंद्र साळुंखे व त्यांची मुलगी सेजल तानाजी साळुंखे (रा. नाव्ही, ता. भोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकीचे नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक राहुल साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार: अजित तानाजी साळुंखे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील तानाजी रामचंद्र साळुंखे हे मुलगी सेजलसह दुपारी चारच्या दरम्यान सारोळा येथील सातारा-पुणे महामार्गावरील धिवार पेट्रोलपंपातून पेट्रोल भरून पुणे-सातारा बाजूने सेवा रस्त्याने जात होते. या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागरिकांनी टँकरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.