आरटीओसमोर बापट यांचे ताट-वाट्या घेऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST2021-05-21T04:11:35+5:302021-05-21T04:11:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षाचालकांना आर्थिक मदतीची घोषणा करून महिना उलटून गेला; मात्र अद्याप राज्य सरकारकडून कोणतीच आर्थिक ...

Bapat's agitation in front of RTO | आरटीओसमोर बापट यांचे ताट-वाट्या घेऊन आंदोलन

आरटीओसमोर बापट यांचे ताट-वाट्या घेऊन आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षाचालकांना आर्थिक मदतीची घोषणा करून महिना उलटून गेला; मात्र अद्याप राज्य सरकारकडून कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) पुणे आरटीओ कार्यालयाच्या पायरीवर रिकामी ताट-वाट्या घेऊन खासदार गिरीश बापट यांनी धरणे आंदोलन केले. या वेळी सर्वांनी तोंडावर काळ्या रंगाचे मास्क लावले होते.

रिक्षाचालकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी दीड हजार रुपयांच्या मदतीची घोषणा झाली. मात्र, अद्याप ती मदत रिक्षाचालकांना मिळालेली नाही. राज्य सरकारने राज्यातील परमीटधारक रिक्षाचालकांना मदतीसाठी जवळपास १८० कोटींचा निधी उपलब्ध करून तो परिवहन विभागाकडे सुपूर्द केला आहे. मात्र लिंक ओपन न होणे, माहिती अर्धवट असल्याची कारणे देणे यामुळे परिवहन विभागाकडून रिक्षाचालकांना मदत देण्यास अडसर निर्माण होत आहे. ही दिरंगाई लवकरात लवकर दूर होऊन प्रशासनाला जाग येण्याकरिता हे आंदोलन असल्याचे खासदार बापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे फेडरेशनचे बापू भावे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे, वाहतूक सेनेचे एकनाथ ढोले, सावकाश रिक्षा संघटना आदींचे प्रतिनिधी आंदोलनात उपस्थित होते.

Web Title: Bapat's agitation in front of RTO