शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील हॉटस्पॉट भागातील बँका बंदच... एटीएम राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:11 IST

नॉन कंटेन्मेंट भागात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यत चालणार काम

ठळक मुद्देबँकांच्या कामकाजाची नवीन नियमावली :

पुणेः शहरातील कोरोना अतिसंक्रमशील भागातील बँका बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने काढले आहेत. या क्षेत्रातील सर्व बँकाना त्यांच्या शाखा बंद ठेवाव्या लागणार आहेत. मात्र त्यांना त्यांची एटीएम सेंटर चालू ठेवता येणार आहेत. अपरिहार्य कारणे, शासकीय अनुदान यासंबंधित कामकाजासाठी शासनाच्या आदेशाचे पालन व्हावे असा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर संक्रमणशील क्षेत्रातील वरील भाग वगळता इतर (नॉन कन्टेन्टमेंट परिसर) मधील बँक ग्राहकांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बँका सुरू राहणार आहे. 

कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन मधील काही अटी अंशतः शिथील करून काही व्यवसायासह इतर सेवांना देखील सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये बँका सुरू करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबाबत एक नियमावली पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अतिसंक्रमणशील क्षेत्र वगळून अशी नियमावली आहे.  संक्रमणशील क्षेत्रातील वरील भाग वगळता इतर (नॉन कन्टेन्टमेंट परिसर) मधील बँक ग्राहकांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बँका सुरू राहतील. त्यानंतर दुपारी दोन ते पाच पर्यंत अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना बँका सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या पन्नास टक्के कर्मचारी कामावर हजर राहू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉन कन्टेन्टमेंट क्षेत्रामधील शाखेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे कन्टेन्टमेंट क्षेत्रामध्ये वास्तव्यस असणारे नसावेत. दरम्यान ज्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. शासनाकडून बँकेच्या कामकाजाबाबत वेगळे निर्देश प्राप्त झाल्यास शहर पोलिस आयुक्तालयाकडील हे आदेश संपुष्टात येतील. असे आदेशात म्हटले आहे.

अशी असेल नवी नियमावली...

- बँक परिसरात गर्दी टाळण्यासाठी खासगी व मान्यताप्राप्त  सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे. - आरोग्यविषयक सर्व खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य - बँक आस्थापना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांयकाळी सात  पर्यंत वास्तव्याच्या ठिकाणी पोहचावे. - बँक प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीच्या आदेशाची प्रत संबंधीत कर्मचाऱ्यांना द्यावी.- सर्व संबंधितानी अधिकृत ओळखपत्र व आदेशाची प्रत जवळ बाळगावी.

टॅग्स :PuneपुणेbankबँकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस