चालकाने लांबवली बॅंकेची चार कोटींची रोकड, हडपसरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:49 IST2017-09-30T00:49:22+5:302017-09-30T00:49:59+5:30
एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 4 कोटींची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसरमधील ससाणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

चालकाने लांबवली बॅंकेची चार कोटींची रोकड, हडपसरमधील घटना
पुणे : एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 4 कोटींची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसरमधील ससाणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बॅंकेच्या सासणेनगर मधील एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी मोटार घेऊन खासगी एजन्सीचे कर्मचारी गेले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक होता. पैसे भरायचे असल्याने हा सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचारी मोटारीतून खाली उतरले.
ही संधी साधत चालकाने गाडी सुरू केली. काही कळायच्या आताच चार कोटी रूपयांची रोकड घेऊन मोटारीसह तो पसार झाला. सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचा-यांनी आरडाओरडा करीत मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू, चालक मोटार न थांबवता तेथून निसटला. काही वेळाने चालक कदाचित परत येईल असे वाटल्याने त्यांनी काही वेळ वाट पाहिली, परंतू, तो न आल्याने त्वरीत हडपसर पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे शहरासह शहराबाहेर जाणा-या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही.